Pune : Daksh Police Times
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४
- By पुणे प्रतिनिधी --
- Tuesday, 19 Nov, 2024 --
- View : 42
➤ मतदान प्रक्रिया ही भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ महाराट्र राज्यात मोठ्या उत्साहात पार पडत आहे. > दिनांक २०/११/२०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ➤ दिनांक १५/१०/२०२४ रोजी महाराष्ट्रात निवडणूकीचे पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागलेपासून पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी नेमून अवैध धद्यांवर छापे घालून तसेच विविध प्रतिबंधात्मक कारवाया करुन मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. > १ कोटी ७६ लाख १७ हजार ५१० रुपयांची रोख रक्कम जप्त केलेली आहे. > दारुबंदी अधिनियमानुसार मोठ्या प्रमाणावर छापे घालून १ कोटी १७ लाख रुपयांची दारु जप्त केली आहे. > ४९ अग्निशस्त्रे व १०० राऊंड जप्त केलेले आहेत. ➤ ३७ लाख ९३ हजार रुपयांचा गांजा व इतर अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत. तसेच गुन्हेगारीस आळा घालण्याच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) चे विविध कलमांखाली १६२८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. > महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ९३ प्रमाणे ३४७ जणांवर, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५, ५६, ५७ प्रमाणे १३६ लोकांना तडीपार केले आहे. > १० गुन्हेगारी टोळ्यांतील ४१ आरोपीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. > ७ आरोपींना स्थानबद्ध केले आहे. > ७१ पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
-: नागरिकांना अवाहन :-
➤ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दरम्यान अफवांवर विश्वास ठेऊ नये. > पोलीसांना सहकार्य करावे. > काही शंका / अडचण असल्यास पोलीसांशी संपर्क साधावा. > मतदान करणे हा प्रत्येक नाकगरिकांचा मुलभूत अधिकार असून जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा व लोकशाही बळकट करण्यास मदत करावी. > मतदान करतांना कोणत्याही मतदारांनी मोबाईल फोन मतदान बूथमध्ये घेऊन जाऊ नये.
-: लावण्यात आलेला बंदोबस्त :-
> १ पोलीस सह आयुक्त, (1-Jt. CP)
> १ अपर पोलीस आयुक्त (1-Addl. CP)
> ६ पोलीस उप आयुक्त (6-DCP)
> ९ सहा. पोलीस आयुक्त (9-ACP)
> ३११ पोलीस निरीक्षक/ सहा. पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक, (311-PI/API/PSI)
➤ ३०९५ पोलीस अंमलदार (3095-Police man)
> १००० होमगार्ड (1000- Home guards)
> २ एसएपीएफ कंपनी (2- SAPF Company)
> ४ सीएपीएफ कंपनी (4- CAPF Company)