Daksh police times
तळवडे वाहतूक विभागातील समसूचकतेमुळे आणि प्रसंगावधान राखून केलेल्या कामगिरी ; दीड वर्षांपूर्वी हरवलेल्या वृद्ध स्त्रीचा शोध लागला असून आई आणि मुलाचे सुखद मिलन घडून आले..
- By पुणे प्रतिनिधी --
- Saturday, 26 Oct, 2024 --
- View : 447
गौतम आकाराम वानखडेव य 39 धंदा मजुरी
मूळ रा जय अंबेनगर, शेगाव ता शेगाव जि बुलढाणा यांची आई नामे लक्ष्मी आकाराम वानखडे वय अंदाजे 80 वर्ष साधारण दीड वर्षापूर्वी आळंदी देवाची येथून हरवलेल्या होत्या परंतु आईचा फोटो नसल्यामुळे पोलिसांमध्ये आई हरवल्या बाबतची तक्रार नोंद केली नव्हती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मूळ गावी आणि आळंदी , पुणे परिसरामध्ये तीन ते चार महिने आईचा खूप शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही.
आज दि 26 ऑक्टोबर 2024 रोजी तळवडे वाहतूक विभागाची नेहमीप्रमाणे आय टी पार्क चौक येथे ptp नाकाबंदी सुरू होती. नाकाबंदी दरम्यान कारवाईसाठी थांबवलेल्या एका वाहन चालकाने आय टी पार्क चौकात कॉर्नरच्या एका हातगाडीवर मागील दीड वर्षांपासून राहणाऱ्या एक वृद्ध स्त्रीला ओळखले. त्यानंतर पो हवा राजु भोसले यांनी सदर वाहनचालकाकडून वृद्ध स्त्रीच्या मुलगा नामे गौतम वानखडे याचा मोबाईल नंबर घेऊन त्यावर संपर्क साधून सापडलेल्या वृद्ध स्त्रीबाबत माहिती देऊन त्याचीच आई असल्याची खात्री पटल्याने तळवडे येथे बोलावून घेतले. सदर वृद्ध स्त्रीने तिच्या मुलाला ओळखले असून तळवडे वाहतूक विभागाचे पोलीसांनी मागील दीड वर्षांपासून हरवलेल्या 80 वर्षाच्या वृद्ध स्त्रीला तिच्या मुलाच्या ताब्यात दिले आहे.
मागील दीड वर्षांपासून वाहतूक पोलीस, तळवडे आय टी पार्क, चाकण midc मध्ये जाणाऱ्या कामगारवर्गाने सदर वृद्ध स्त्रीला वेळोवेळी जेवण, कपडालत्ता, औषधोपचार करून संगोपन केले होते.
पोलीस उपायुक्त (वाहतूक) श्री. बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे वाहतूक विभागाचे सपोनि मधुकर थोरात, पो हवा राजु भोसले व तळवडे वाहतूक विभागातील इतर अंमलदार यांच्या समसूचकतेमुळे आणि प्रसंगावधान राखून केलेल्या कामगिरीमुळे दीड वर्षांपूर्वी हरवलेल्या वृद्ध स्त्रीचा शोध लागला असून आई आणि मुलाचे सुखद मिलन घडून आले..