No icon

Pune : Daksh Police Times

राहुल ठाकूर मोक्क्यातील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस केले जेरबंद

 

दिनांक २३/०२/२०२४ रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ७९/२०२४ भा.दं.वि. कलम ३२६, १४३,१४७,१४९,३३६,३२३,५०४,५०६,४२७, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), सह क्रिमीनल अमेंडमेन्ट लॉ अॅक्ट कलम ७. मपोअधि कलम ३७ (१) (३) सह १३५, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (11),

३(२) व ३(४) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील ६ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी राहुल मुन्नासिंग ठाकूर याचा शोध चालू असताना दिनांक २२/०७/२०२४ रोजी पोलीस अंमलदार विजय भुरुक व संभाजी दराडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून मोक्कामधील फरार असलेला राहुल ठाकुर हा त्याचे घरी आईकडून पैसे घेण्याकरीता येणार असल्याची बातमी मिळाल्याने सपोनि रणजीत मोहिते, पोउपनिरी रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार विजय भुरुक, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, अमोल सुतकर असे रामनगर येथील शिवाजी चौक ते अचानक चौक यामध्ये ठिकठिकाणी पोलीस असल्याची ओळख लपवून सापळा रचून थांवले असताना त्यांना सायंकाळी ०५.२५ वाजताचे सुमारास शिवाजी चौकातून अचानक चौकाकडे जाणाऱ्या रोडवर एका रिक्षामध्ये तोंडाला रुमाल बांधून वसलेला इसम संशयित वाटल्याने त्यांनी सदरची रिक्षा थांबवून संशयित इसमाकडे विचारपूस करू लागले. तेव्हा पोलीस अंमलदार विजय भुरुक यांनी पाहीजे असलेला आरोपी राहुल मुन्नासिंग ठाकुर हा तोच असल्याचे ओळखले. त्यावरून सदर स्टाफने त्यास लागलीच पकडून नाव पत्ता विचारला असता त्याने राहूल मुत्रासिंग ठाकुर, वय २९ वर्षे, रा. अचानक चौक, रामनगर, वारजे माळबाडी पुणे असे सांगितले. मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी हा तोच असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेवून अटक केली आहे. अधिक तपास श्री. रंगनाथ उंडे, सहा. पोलीस आयुक्त साो, कोथरुड विभाग, पुणे शहर हे करत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, सह- पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. प्रविणकुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री संभाजी कदम साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३, पुणे शहर, मा. श्री. रंगनाथ उंडे साो, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर, यांचे आदेशाने वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. रणजित मोहिते, पोलीस उपनिरीक्षक श्री. रामेश्वर पार्वे तसेच अंमलदार पोलीस हवालदार प्रदिप शेलार, पोलीस कॉन्स्टेबल मनोज पवार, विजय भुरुक, दक्ष पाटील, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, शिरीष गावडे, अमोल सुतकर, विकास पोकळे व सत्यजित लोंढे यांनी केलेली आहे

Comment As:

Comment (0)