No icon

Daksh police times

मुकबधीर वृद्धेवर अत्याचार. २७ वर्षीय तरुण अटकेत.


भडगाव वार्ताहर — 
तालुक्यातील एका गावातील  ६५ वर्षीय मुकबधीर महिला ही आपल्या अंगणात खाटीवर झोपली असताना गावातील  २७ वर्षीय तरुणाने मध्यरात्री या मुकबधीर महिलेवर अत्याचार करून पळ काढला म्हणुन भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्यात फरार झालेल्या आरोपीला एका तासाच्या आत भडगाव पोलीसांनी अटक केली आहे.
या बाबत अधिक, तालुक्यातील एका गावात दि.१५  रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ६५  वर्षीय मुकबधीर महिला ही  तीच्या अंगणात झोपली असतांना गावातील २७ वर्षीय तरूणाने अत्याचार करून रक्त बंबाळ केले. या वेळी महीलेने  आरडाओरड केली तेव्हा नातेवाईक जागे झाले तोपर्यंत आरोपी घटना स्थळावरून पसार झाला होता. या घटनेची माहिती भडगाव पोलीसांना मिळताच भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के, पोलीस हवालदार संजय पाटील, निलेश ब्राह्मणकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी, संभाजी पाटील यांनी आरोपीला एका तासाच्या आत अटक केली. या बाबत २७ वर्षीय तरुणा विरुध्द भडगाव पोलीस स्टेशनला गु.र.न. ४२४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३३३,६४(१),६४ (२).( के ),( १ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा  पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के हे करीत आहेत. या घटनेने भडगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Comment As:

Comment (0)