Pune : Daksh Police Times
हवेली पो. स्टे., पुणे ग्रामीण विधीसंघर्ष ग्रस्त बालक वैद्यकीय तपासणी करून त्यांना पालकांसह ताब्यात देण्यात आले आहे.
- By पुणे प्रतिनिधी --
- Friday, 06 Sep, 2024 --
- View : 115
* हवेली पो. स्टे., पुणे ग्रामीण, गु. र. नं. 209/2024, BNS 109,351 (2)(3), आर्म अॅक्ट 4(25)* मधील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीबाबत *पो. अंमलदार 8732 साईकुमार कारके यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचे दोन्ही आरोपी हे खेडकर लेन मधील बंद पडलेल्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये, नन्हे, पुणे येथे येणार असलेबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी ADS - 1 युनिटचे सपोनि प्रविन काळुखे व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचून दोन्ही इसमांना शिताफिने ताब्यात घेतले व ताब्यात घेण्यात आलेल्या इसमापैकी * अनु क्रं 1) हर्षद संदीप वांजळे, वय - 18 वर्ष रा. औदुंबर कॉलनी वारजे जकात नाका पुणे असे सांगितले व अनु क्रं 2 हा विधीसंघर्ष ग्रस्त बालक असल्याने दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने दोघांकडे चौकशी करता त्यांनी दाखल गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने वरील नमूद अनु क्रं 1 याची व याची ससून हॉस्पिटल ये विधीसंघर्ष ग्रस्त बालकथे वैद्यकीय तपासणी करून त्यांना हवेली पो.स्टे. पुणे ग्रामीण यांचे पालकांसह ताब्यात देण्यात आले आहे.