No icon

Pune : Daksh Police Times

रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून मध्य प्रदेश येथील सराईत गुन्हेगारा कडून दोन गावठी पिस्तूल व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला..

रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून मध्य प्रदेश येथील सराईत गुन्हेगारा कडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंती काडतूस एकूण 51,000/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला..

दिनांक 10/08/2024 रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. डॉ. विशाल जयस्वाल यांनी त्यांच्या कॅबीनमध्ये पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पोहेकॉ रविंद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, पोकों विकार शेख अशांना कॅबिनमध्ये बोलावून कळविले मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत पाल ते खरगोन रस्त्यावरील हॉटेल जय पॅलेस समोर एक इसम गावटी देशो बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी वर प्रमाणे पोलीस स्टॉफ रवाना होवून संशयीत इसमास सापळा रचून ताब्यात घेतले सदर इसमास ताब्यात घेवून त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी बनावटीच्या 02 रिव्हाल्वर व 02 जिवंत काडतूस असा एकुण 51,000/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्यावरुन नामे तोफसिग चतरसिंग चावला वय 27 वर्षे रा.धसली ता. झिरण्या जि. खरगोण (मध्य प्रदेश) यास ताब्यात घेवुन त्यास रावेर पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाही कामी घेवून आलो पोकों/ 2059 महेश मोगरे यांच्या फिर्याद वरुन रावेर पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुरन 379/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3,25 प्रमाणे सहकलम मुंबई पोलीस अधिनियम 37 (1) (3) चे उल्लघन कलम 135 प्रमाणे व भारतीय न्यास संहिता कलम 223 प्रमाणे दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदशनाखाली

पोउनि तुषार पाटील हे करीत आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी सो, मा. श्री अशोख नखाते साहेब, अपर पोलीस अधिक्षक जळगांव, श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, पोलीस निरीक्षक डॉ.श्री विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पोहेको रविंद्र बंजारी सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, पोकों विकार शेख, पोकों अतुल गाडीलोहार यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे।

Comment As:

Comment (0)