No icon

Pune : Daksh Police Times

खडकी पोलीस स्टेशनचे पोलिसावलदार रात्री दीड वाजता अज्ञात ईनोवा गाडीने धडक देऊन पळून गेले ,जागीचीच मृत्यू झाला आहे

खडकी पोलीस स्टेशनचे खडकी बाजार मार्शल वरील कर्मचारी संजोग शिंदे आणि पोलिसावलदार कोळी यांना रात्री दीड वाजता अज्ञात ईनोवा गाडीने बोपोडी चौक येथे जोरदार धडक देऊन पळून गेले आहेत त्यामध्ये पोलिसावलदार कोळी यांचा जागीचीच मृत्यू झाला आहे आणि संजू शिंदे हे गंभीर जखमी आहेत त्यांना रुबी हॉल क्लिनिक येथे ऍडमिट केले आहे

पुणे पोलिस तणावाखाली? 
बोपोडी येथील घटनेनंतर मार्शल असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याची ही बोलती प्रतिक्रिया आहे. आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर तळमळीने हा कर्मचारी सांगत होता. त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिस आयुक्तांची पोलिस कर्मचाऱ्यांना फारच भीती वाटते. त्यांच्याकडून काम करताना ‘मोटीवेशन’साठी एकदाही दरबार घेतलेला नाही.  मार्शल ड्युटी अंमलदार हे एमडीटी कॅाल, नियंत्रण कक्षाचा कॅाल, मायसेफ फोटो, पोलिस निरीक्षकांना माहिती देणे, परिमंडळाच्या ग्रूपवर माहिती देणे, या शिवाय तुमचे वाहन ( मार्शलची दुचाकी)  कधी सुरू केले, मीटर रिडिंग देणे, ही माहिती देत असतात. हे सर्व कशासाठी आणि एवढा दबाव का? मार्शल अंमलदार प्रेशर कुकरपेक्षाही अधिक दबावाखाली आहेत. त्यात आयुक्तांकडून कधी निलंबन होईल, याची सारखी भीती. एकिकडे सर्वसामान्यांना सगळी सूट असून दुसरीकडे पोलिस मार खात, शिव्या खात आहेत, आणि आता पोलिसांचा जीवही जायला लागला आहे. कोणी आमच्याकडे लक्ष देईल का? असे गाऱ्हाणे या कर्मचाऱ्याचे होते. त्याच्या गतीमतीनुसार तो मार्शलची बाजू मांडत होता. मला एकूणच असे जाणवले की, गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे पुणे पोलिस दल फारच तणावाखाली आहे. राजकारण्यांकडून त्यांचे राजकारण केले जाईल, पोलिस नेतृत्वाने तो राजकीय दबाव आपल्या सहकाऱ्यांवर टाकता कामा नये आणि नेत्याची हीच तर विशेषता असते.  एकमेकांकडे संशयाने बघता बघता पोलिस दलात निर्माण झालेले असुरक्षिततेचे वातावरण हे काही चांगले नाही. एकदा बदली झाली किंवा निवृत्त झाल्यावर ना पब्लिक विचारते ना सहकारी. त्यामुळे नोकरी करताना कायम तारतम्य भाव बाळगायला हवा असे मला वाटतं.

Comment As:

Comment (0)