No icon

Pune : Daksh Police Times

सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील पोलीसांनी वाहनचोरी करणारे पती पत्नी यांचेकडुन एकूण १२,७०,०००/- रुपये किंमतीचा मुददेमला केला जप्त.

सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील पोलीसांनी वाहनचोरी करणारे पती पत्नी यांचेकडुन ०८ चारचाकी व ०९ मोटार सायकली असे एकुण १७ वाहन चोरीचे गुन्हे उघड करुन एकूण १२,७०,०००/- रुपये किंमतीचा मुददेमला केला जप्त.

सदर बाबत अधिक माहिती अशी की, वाहन चोरीच्या गुन्हयांचे अनुषंगाने विशेष प्रयत्न करुन वाहन चोरीचे गुन्हे उघड आणण्याबाबत श्री अमितेष कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार मा. पोलीस उप आयुक्त साो परि -३ पुणे शहर श्री संभाजी कदम यांचे मार्गदर्शनाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कुंभार, यांनी तपास पथकाचे सपोनि सचिन निकम, व पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर यांचे विशेष पथके नेमले होते.

सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार वाहन चोरीच्या अनुषंगाने तपास करित असतांना त्यांना अशी माहिती मिळाली की, एक पुरुष व एक महिला असे दोघे मिळून चारचाकी व दुचाकी वाहन चोरी गुन्हे करित आहे. त्या अनुषंगाने या पथकाने सखोल माहिती घेतली असता तपास पथकातील पोलीस अंमलदार उत्तम तारु, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर यांना दिनांक ०७/०६/२०२४ रोजी अशी माहिती मिळाली की, ते दोघे पुरूष व महिला आरोपी हे लोणीकाळभोर येथील वडकीनाला याभागामध्ये रस्त्याचे कडेला एका कारमध्ये बसले आहे. अशी माहिती मिळाली असता त्याअनुषंगाने तपास पथकाचे सपोनि सचिन निकम व पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांची पथके यांनी सदर भागामध्ये सापाळा लावुन दोघा संशयीतांना ताब्यात घेवुन अटक करुन त्यांचेकडे चौकशी केली असता आरोपींनी पुणे पोलीस आयुक्तालयातील एकुण १७ दुचाकी व चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली देवुन त्यातील चोरी केलेल्या एकुण ८ चारचाकी व ९ दुचाकी वाहने असा मुददेमाल आरोपींने कावुन दिला आहे.

अटक आरोपीकडे तपास पथकाचे सपोनि सचिन निकम यांनी तपास केला असता असे दिसुन आले की, दोघे आरोपी हे नवरा बायको असुन ते पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर राहुन दिवसभर टेहळणी करुन रात्रीचे वेळी बाहेर पडुन चारचाकी व दुचाकी वाहने चोरी करत होते. दोघे पती पत्नी गाडीवर असल्याने कोणालाही संशय येणार नाही अश्या पध्दतीने बेमालुमपणे वाहन चोऱ्या करित होते. परंतु अत्यंत शिताफीने व गोपनीय पध्दतीने सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील तपास पथकाचे सपोनि सचिन निकम व पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर यांचे पथकाने सलग दोन महिने अथकपणे दोघा आरोपींचा मागोवा घेतला आणि आरोपीना लोणीकाळभोर वडकीनाला या भागातुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी करुन आरोपींनी चोरलेल्या एकुण ८ चारचाकी व ९ दुचाकी वाहने ही आरोपीने नागपुर, शिर्डी, श्रीरामपुर येथे विकली होती सदर ठिकाणी जावुन गुन्हयातील एकुण १७ वाहने असे एकुण १२,७०,०००/- किं चा. मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीकडून खालील पोलीस स्टेशन कडील दुचाकी व चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहे.

असे एकुण १७ चारचाकी व दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघकीस आणले आहेत.

सदरची कामगिरी श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री प्रविण पवार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री.प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.संभाजी कदम सो, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३, पुणे शहर, श्री जगदीश सातव सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री. विजय कुंभार साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, श्री संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षीरसागर, राहुल जलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, शिरीष गावडे यांचे पथकाने केली.

आरोपी नामे :- १) शाहरुख राजु पठाण वय २४ वर्षे रा. कुंजीर लॉनच्या बाजुला कुंजीर याडी पुणे, मुळ पत्ता- वार्ड नंबर ५ निरा, ता. बारामती जि पुणे

यास दिनांक ०७/०६/२०२४ रोजी १७.२० वा अटक करण्यात आली असुन त्यास योग्य त्या पोलीस बंदोबस्तात मा. न्यायालयात रिमांड रिपोर्टसह हजर केले असता त्याची दिनांक १८/०६/२०२४ रोजी पर्यत पोलीस कस्टडी आहे.

२) पुजा जयदेव मदनाल ऊर्फ आयशा शाहरुख पठाण वय २१ वर्षे रा. कुंजीर लॉनच्या बाजुला कुंजीर वाडी पुणे, मुळ पत्ता- वार्ड नंबर ५ निरा, ता. बारामती जि पुणे..

 

Comment As:

Comment (0)