Daksh Police Times
Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील पुणे पोलिस आयुक्तांची बदली करावी, अशी मागणी संजय मोरेनी केली आहे...
- By पुणे प्रतिनिधी --
- Saturday, 01 Jun, 2024 --
- View : 189
Pune News : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला तत्परतेने मिळालेला जामीन आणि संशयास्पद वर्तणुकीमुळे पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखली जावी. यानिाठी तातडीने पुणे पोलिस आयुक्तांची बदली करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शुक्रवारी करण्यात आली. पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी म्हटले आहे, की अपघातानंतर स्थानिक आमदाराच्या हस्तक्षेपामुळे अल्पवयीन आरोपीच्या रक्त चाचणीला काही काळ उशीर झाला. याशिवाय राज्यपातळीवरील अनेक नेत्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचे काम केले आहे. केंद्रातील एक मोठा नेता गरीब आणि श्रीमतामध्ये दरी तयार करत आहे.
त्यात श्रीमंतांनी गरिबांना गाडीने उडविले, तरी त्यांना गुन्ह्यातून सवलत, अशी पद्धत विकसित करण्याचे काम केले आहे. त्यामुळे शहराची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर, अशी ओळख पुसून चुकीची संस्कृती विकसित करण्याचे काम होणार असेल, तर आम्ही ते सहन करणार नाही.
आता पबचालक व मालकांनी प्रशासन व सरकार विरोधात आंदोलन करण्यासाठी मुलाचा वापर केला. याबाबत पबमालकाना कड़क शासन झालेच पाहिजे अन्यथा त्याना पोलिसाची साथ असल्यावर शिक्कामोर्तब होईल, म्हणुनच पोलिस आयुक्ताची बदली क्रमप्राप्त ठरते, असे मोरे यानी नमूद केले आहे.