Daksh Police Times
चतु श्रृंगी पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारासह रिक्षा चोरणाऱ्या दोन गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या: 11 दुचाकी व एक रिक्षा असा एकूण 6 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त .
- By पुणे प्रतिनिधी --
- Saturday, 06 Apr, 2024 --
- View : 128
पुणे : चतु श्रृंगी पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारासह रिक्षा चोरणाऱ्या दोन गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 11 दुचाकी व एक रिक्षा असा एकूण 6 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून नऊ दुचाकीचे आणि एक रिक्षा चोरीचा (Vehicle Theft) गुन्हा उघडकीस आला आहे.
पुणे शहरामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर चतुः श्रृंगी पोलीस ठाण्यातील तपास पथक दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी श्रीकांत साबळे यांना मिळालेल्या माहिती मिळाली की, सीसीटीव्ही मध्ये दिसणारा कन्हैया पवार हा बाणेर येथील गणराज चौकात राहत आहे.कन्हैया दत्तप्रसाद पवार (वय 19 रा. कळमकर चौक, बाणेर रोड, पुणे), किशन राजेश राम (वय-20 रा. वाकड), चंद्रकांत रामा पाटेकर (वय-24 रा. धेरगाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अधिक चौकशी करुन आरोपीकडून 4 लाख 80 हजार रुपयाच्या 11 दुचाकी जप्त केल्या आरोपीकडून वतुः श्रृंगी पोलीस ठाण्यातील सात आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीने चोरलेल्या दुचाकी विकून मिळणाऱ्या पैशातून मौजमजा करता यावी यासाठी दुचाकी चोरत्याची कबुली दिली.तसेच तपास पथकाने किशन राम व चंद्रकांत पाटेकर यांना अटक करुन त्यांच्याकडून पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या रिक्षा चोरीवा गुन्हा उघडकीस आणला त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीची अटो रिक्षा जप्त केली आहे.