No icon

Daksh Police Times

विशेष पथकाचे अवैध वाळु वाहतुक तसेच देशी विदेशी दारूची चोरटी विक्री, साठा, तसेच वाहतुक, करणा-यावर सलग धाडी 11,56,000/- मुद्देमाल जप्त

मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी जिल्हयातील चोरटया मार्गाने चालणारे अवैध धंद्या संदर्भात सक्त भूमिका घेवुन त्यांचेवर अंकूश बसविण्यासाठी जिल्हयातील अवैध धंद्यावर छापेमारी करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याच प्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हयातील चोरटी दारु विक्रेते, साठवणुकदार, तसेच वाहतुक करणा-या विरुध्द धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असुन मा. पोलीस अधीक्षक यांना अवैधधंद्याबाबत प्राप्त होणा-या माहितीच्या आधारे विशेष पथकाद्वारे छापेमारी करण्यात येत आहे.

या अनुषंगाने जिल्हयातील पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण, सिल्लोड शहर, विडकीन, खुलताबाद, पैठण, अशा 06 ठिकाणी धाडी घालण्यात आल्या आहेत.

यामध्ये पोलीस ठाणे सोयगाव हद्यीतील जरंडी माळेगाव जाणारे रोडवर अवैधरित्या गौणखनिज वाळु ही विना परवाना बेकायदेशीररित्या वाहतुक करतांना सुनिल विजय सावळे वय 25 वर्ष स. ओझर ता. पाचोरा जि. जळगाव या शिताफिने पकडुन त्याचे ताब्यातुन वाळुसह ट्रक क्रमांक एम एच 18 बी. जी. 4411 असा एकुण 10,25,000/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येवुन त्याचे विरूध्द पोलीस ठाणे सोयगाव येथे भादंवी कलम 379 सह 21 (1) गौण खनिज अधिनियम अन्वये गुन्हा

दाखल करण्यात आला आहे.

तसेच अवैधरित्या देशी विदेशी दारुची चोरटी वाहतुक, साठा करतांना खालील प्रमाणे छापेमारीकरून 18 बॉक्स देशी विदेशी दारू ज्यामध्ये 900 वॉटल कि.अं. 1,31,000/- रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

1) सिल्लोड ग्रामीण हद्यीतील केळगाव येथील राहुल ऊर्फ महेंद्र रतनलाल जैस्वाल वय 29 वर्षे रा. केळगाव ता. सिल्लोड याने त्याचे राहते घरात 180 एमएल च्या देशी दारूच्या 13 बॉक्स ज्यामध्ये 636 बॉटल ज्याची किंमत 46560/- रूपयांची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने लपवून ठेवले होते. क्ष्यावर सापळा लावुन त्यास शिताफिने पकडुन माल जप्त करण्यात आला आहे.

2) पोलीस ठाणे सिल्लोड शहर हचीतील भराडी जाणारे रोडवर राजेंद्र चव्हाण वय 28 वर्षे रा. मोंढा बु. ता. सिल्लोड हा त्याचे प्लॅटिना मोटरसायकलवर 180 एमएल च्या देशी दारूचे दोन बॉक्स ज्यामध्ये 96 बॉटल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करतांना पथकाच्या सापळ्यात अडकल आहे. त्याचे ताब्यातुन मोटरसायकल व दोन बॉक्स असा एकुण कि.अं. 26670/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

3) पोलीस ठाणे बिडकीन हद्यीतील लोहगाव येथील अनिल अशोक रूपेकर वय 42 वर्षे रा. लोहगाव यांने 180 एमएल च्या देशी दारूचे दोन बॉक्स ज्यामध्ये 96 बॉटल गोणी मध्ये टाकुन विक्री करण्याचे उद्देशाने घेवुन जातांना लोहगाव शिवारातील पानटपरीवर मुद्देमालासह त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

4) पोलीस ठाणे खुलताबाद हद्यीतील बाजारसावंगी येथील आदर्श बैंकेच्या जवळ मोटरसायकलवर भाडुसाहेब कारभारी नलावडे वय 40 वर्षे रा. बाजारसावंगी हा देशी दारू चा 180 एमएल च्या देशी दारूचे एक बॉक्स ज्यामध्ये 48 बॉटल व मोटरसायकल असा एकूण 44800/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

5) पोलीस ठाणे पैठण परिसरातील बाजारतळ परिसरातील राहणारा राजेश साहेबराव पवार वय 32 वर्षे रा. बाजारतळ, पैठण याने अवैध रित्या 180 एमएल च्या देशी दारूचे 31 बाटल्या या विक्री करण्याचे उद्देशाने लपवून ठेवलेल्या 3100/- कि.अं. मिळुन आल्या आहेत.

यातील आरोपी नामे 1) राहुल ऊर्फ महेंद्र रतनलाल जैस्वाल वय 29 वर्षे रा. केळगाव ता. सिल्लोड 2) राजेंद्र चव्हाण वय 28 वर्षे रा. मोंढा बु. ता. सिल्लोड 3) अनिल अशोक रूपेकर वय 42 वर्षे रा. लोहगाव 4) भाऊसाहेब कारभारी नलावडे वय 40 वर्षे रा. बाजारसावंगी ता. खुलताबाद 5) राजेश साहेबराव पवार वय 32 वर्षे रा. बाजारतळ, पैठण नमुद आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष पथकाद्धारे अवैध वाळु वाहतुक तसेच देशी दारु वावत छापे मारुन एकुण 11,56,000/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद कारवाई ही मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकांने केलेली आहे

Comment As:

Comment (0)