No icon

Pune : Daksh Police Times

गणेशखिंड रोडवर पुणे विद्यापीठ चौकामध्ये उड्डाणपूल व मेट्रो पिलरचे काम चालु आहे

वाहतुक शाखा, पुणे शहर पोलीस उप आयुक्त, वाहतुक यांचे कार्यालय, बंगला नं ६ येरवडा पोस्ट ऑफीस शेजारी, पुणे

पुणे पोलीस

जावक क्रमांक -पोउपआ/वाह/नियो./ 105/२०२४

प्रेसनोट

दिनांक : ०१/०२/२०२४

गणेशखिंड रोडवर पुणे विद्यापीठ चौकामध्ये उड्डाणपूल व मेट्रो पिलरचे काम चालु आहे. त्यामुळे दोन्ही बाजुचा रस्ता अरुंद झालेला असल्यामुळे गणेशखिंड रोडवरुन वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेसमुळे गणेशखिड रोड, औंध रोड, बाणेर रोडवर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्याचे दृष्टीने संचेती हॉस्पीटल चौकामधून गणेशखिंड रोडने विद्यापीठ चौक, औंध रोडवरुन पिपरी चिंचवड, हिंजवडी या भागामध्ये जाणाऱ्या व पिंपरी चिंचवड, हिंजवडी भागामधून औंध रोडने पुणे विद्यापीठ चौकामधुन संचेती हॉस्पीटल बौकामध्ये येणाऱ्या लक्झरी बसेसच्या मार्गामध्ये व वेळेमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

याकरीता महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए.०१९६/८७१/ सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मी शशिकांत बोराटे, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक, पुणे शहर गणेशखिंड रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेसच्या मार्गात व वेळेत दि. १०/०२/२०२४ रोजीपासून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे तात्पुरत्या स्वरुपात खालीलप्रमाणे बदल करीत आहे.

> गणेशखिंड रोडवरील उड्डाणपुल व मेट्रोचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत पुणे शहरातुन संचेती हॉस्पीटल चौकामधून गणेशखिंड रोडने विद्यापीठ चौक, औंध मार्गे पिंपरी चिंचवड, हिंजवडी या भागामध्ये जाणाऱ्या

व पिंपरी चिंचवड, हिंजवडी भागामधून औंध रोडने पुणे विद्यापीठ चौकामधुन संचेती हॉस्पीटल चौकामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या लक्झरी बसेसना दि. १०/०२/२०२३ रोजी पासून सकाळी ०८.०० ते २२.३० वा. पर्यंत प्रवेश बंद राहिल

✓ पर्यायी मार्ग:- जुना पुणे मुंबई महामार्गावरुन हॅरीस ब्रिजमार्गे पुणे शहरामध्ये यावे व शहरामधुन जावे किंवा बायपास रोड मार्गे कात्रज खडी मशिन चौक मार्गे जाये किवा यावे.

Comment As:

Comment (0)