No icon

सदगुरुनगर भोसरी येथील लेबर कैम्पमध्ये पाण्याची टाकी फुटुन झालेल्या दुर्घटनेतील कारवाईबाबत.

हकीकत :- बांधकाम कंपनी NCCL मार्फत लांडेवाडी भोसरी या ठिकाणी बांधकामाची साईट चालु असुन सदर साईडवर काम करणाऱ्या मंजुरांचे निवास व्यवस्थेसाठी सदगुरुनगर येथे कंपनी मार्फत लेबर कैम्प उभारण्यात आला आहे. सद्यस्थितीत सदर कॅम्पमध्ये ३५० कामगार वास्तव्यास असुन त्यांच्या निवासासाठी तात्पुरत्या स्वरुपात खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. आज सकाळी ०६.३० वा. चे सुमारास सदर साईडवर असलेल्या पाण्याची टाकी फुटुन अपघात झाल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी मा. पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली आहे. सदर ठिकाणी NCCL कंपनी मार्फत मजुरांच्या राहाण्याची व इतर व्यवस्था करण्याची जबाबदारी श्री विनायक इंडस्ट्रीअल सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आली असुन कुमार भारत लोमटे हे या कंपनीचे मालक आहेत. सदर लेबर कॅम्पची उभारणी त्यांनी केली असुन सुमारे अडीच महिन्यापासुन ते सदर कॅम्पचे व्यवस्थापन करीत आहेत. मंजुरांना वापराचे पाणी कमी पडत असल्यामुळे त्यांनी जमीनीवरती नवीन टाकीचे बांधकाम केले होते. सदर बांधकाम हे दोन दिवसापुर्वी पुर्ण झाले होते. आज सकाळी सदर टाकीमध्ये पुर्ण क्षमतेने पाणी भरल्यावर टाकी फुटुन बाजुला अंघोळीसाठी जमलेले मजुर जखमी होऊन त्यापैकी गंभीर दुखापत झालेले ५ मजुर आतापर्यंत मृत्यु पावले आहेत. मृतकांची नावे पुढील प्रमाणे १) नवीन जोन्ना २) माल्ला महाकुर ३) सोनु कुमार ४) रविंद्र कुमार ५) सुदाम बेहरा सर्व रा. लेबर कॅम्प, सदगुरुनगर, हनुमान कॉलनी, भोसरी, पुणे. तसेच सदर दुर्घटनेत इतर ६ मजुर जखमी झालेले आहेत.

सदर घटनेत प्राथमिक तपासादरम्यान मजुर कॅम्पाचे व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या श्री विनायक इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसचे कुमार भारत लोमटे यांनी पाण्याच्या टाकीचे निकृष्ट व कच्चे बांधकाम केल्याने व त्यांच्या बेपरवाई व हलगर्जीपणा मुळे ते ५ कामगारांच्या मृत्युस कारणीभुत झाल्याने त्यांचेवर संतोषकुमार रामनरेश सहानी, उम्र ३५ साल, व्यवसाय मजदूर, पता लेबर कॅम्प, सदगुरुनगर, हनुमान कॉलनी, भोसरी, पुणे मुल पत्ता गंगापूर, तहसील चुनार, जि. मिर्झापुर, उत्तरप्रदेश यांचे तक्रारीवरून भोसरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६५९/२०२४ बीएनएस कलम- १०५, १२५ (ए), १२५ (बी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी पोलीसांच्या ताब्यात असुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालु आहे.

Comment As:

Comment (0)