Pune : Daksh Police Times
खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक, गुन्हे शाखेची कामगिरी
- By पुणे प्रतिनिधी --
- Monday, 21 Oct, 2024 --
- View : 194
०१ कोटी रुपयाच्या खंडणीसाठी एका इसमाचे अपहरण करुन त्यास झारखंड व पश्चिम बंगाल बॉर्डरवरील गंगा नदीतील बेटावर डांबुन ठेवलेल्या, अपहृत इसमाची सुखरुप सुटका करुन, ०३ आरोपींना अटक केली.
दिनांक १८/१०/२०२४ रोजी अपहृत इसमाचा मुलगा प्रभारी अधिकारी, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक यांना भेटून माहिती दिली की, त्यांचे वडील दिनांक १७/१०/२०२४ रोजी पासून घरी नसून, त्यांना त्यांचे वडीलांचे मोबाईल फोनवरुन, ०१ कोटी रुपयेची खंडणीची मागणी केली तसेच पैसे न दिल्यास तसेच पोलीसांकडे गेल्यास तक्रारदारांचे वडीलांना जीवे ठार मारु अशी धमकी दिली. तक्रारदाराने असे सांगितल्याने, प्रभारी अधिकारी, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक यांनी सदर प्रकाराबाबत गांभीर्य ओळखून, वरीष्ठांना माहिती कळवून, तक्रारदार यांची तात्काळ तक्रार घेवून, त्याबाबत हिंजवडी पोलीस ठाणे गु. रजि नं. ११८५/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम १४० (२), १४२,३०८ (३), ३०८ (४), ३०८ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून, मा. पोलीस आयुक्त व मा. सह पोलीस आयुक्त, यांचे नेतृत्वाखाली अप्पर पोलीस आयुक्त श्री वंसत परदेशी, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री संदिप डोईफाडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे ०१ डॉ. विशाल हिरे, वपोनि खंडणी विरोधी पथक श्री देवेंद्र चव्हाण, वपोनि युनीट ०४ संदिप सावंत यांच्या टिम तयार करुन, अपहरण झालेल्या इसमांची सुखरुप सुटका करुन, आरोपीतांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करीत असतांना अपहरण झालेल्या इसमास नारळ पाणी विक्रेता याने विमानाने कोलकत्ता, (पश्चिम बंगाल) येथे घेवून गेल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, पुणे
विमानतळावरील कोलकत्त्याला जाणाऱ्या विमानातील प्रवाशांची माहिती घेवून, सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन संशयीत इसमांची माहिती प्राप्त करुन, प्राप्त मोबाईल नंबरचे पोहवा सुनिल कानगुडे व नागेश माळी यांनी तांत्रिक विश्लेषण करुन, इतर संशयीत इसमांचे मोबाईल नंबर प्राप्त केले. त्या दरम्यान गुन्हेशाखेकडील पोउपनिरी सुनिल भदाणे, अशोक जगताप व पोलीस अमंलदार प्रदीप गोडांबे, मंगेश जाधव व रामदास मोहिते यांना अपहृत इसमाचा व आरोपींचा शोध घेणेकरीता झारखंड व पश्चिम बंगाल राज्यात रवाना करण्यात आले. दरम्यान अपहृत व्यक्तीच्या मुलास आरोपी हे त्यांच्या वडीलांच्या फोनवरुन, ०१ कोटी लवकर जमा कर, पोलीसाकडे गेल्यास अगर काही गडबड केल्यास तुझ्या वडीलांना ठार मारुन टाकू. अशी धमकी देवून, रात्री १० पर्यंत पैसे जमा कर. त्यानंतर कोठे यायचे ते सांगतो असे सांगून, फोन बंद करत होते. त्यानंतर पुन्हा सांयकाळी ०७/३० वाजता आरोपीतांनी फोन करुन, पैसे किती जमा झाले. अर्धा तासात पुणे रेल्वे स्टेशन येथे घेवून ये. असे कळवून फोन बंद केला. अपहृत इसमाचे मुलास खंडणीच्या पैशाकरीता फोन येत असल्याने, मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पोलीस अधिक्षक, मालदा, (पश्चिम बंगाल) व साहीबगंज, (झारखंड) यांचेशी संपर्क करुन, दाखल गुन्हयाबाबत माहिती देवून, तपासात मदत करण्याबाबत कळविले.
त्यानंतर गुन्हेशाखेकडील पथक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, राजमहल, (झारखंड) यांचे पथकाने रात्रीच्या अंधरात आरोपींचा पालचगाची प्राणपूर, बनुटोला आणि गोल ढाब खोऱ्यात गंगा नदीतुन बोटीतून आणि चिखलातून पायी प्रवास करुन पथकाने आरोपीचा माग काढत, गंगा नदी पाञात गोलढाब बेटावर छापा कारवाई करुन, पहाटे ०५.०० वाचे सुमारास अपहृत इसमाची सुखरुप सुटका करुन, आरोपी नामे १) नसीम मनीरुल हक अख्तर वय-२० वर्षे रा. धरमपूर, तीनमुहानी, ठाणे-मुथाबाडी जिल्हा-मालदा राज्य पश्चिम बंगाल २) लल्लू रुस्तम शेख वय-४५ वर्षे रा.अमानत दियारा, ठाणे-राधानगर, जिल्हा-साहेबगंज राज्य झारखंड यांना ५०,०००/-रु किंच्या ०३ मोबाईलसह ताब्यात घेवून, अटक केली. ०३ आरोपी गंगा नदीत उडी मारुन पळून जाण्यास यशस्वी झाले. तसेच आरोपीतांचा एक साथीदार हा कल्याण ठाणे येथे असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने, गुन्हेशाखेकडील सपोफौ रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार गावांडे व राणे यांना कल्याण ठाणे येथे रवाना करुन, आरोपी नामे साजीम करिम बबलू शेख, वय २० वर्षे, छक्कुटोळा, ता. मोथाळवाडी, जि.मालदा राज्य-पश्चिम बंगाल यास २०,०००/- किंच्या ०२ मोबाईल फोनसह ताब्यात घेतले. तसेच इतर तीन आरोपींचे नाव निष्पन्न करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाणे
करीत आहे.
मा. पोलीस आयुक्त, मा.अपर पोलीस आयुक्त, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हेशाखा व मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ तसेच संपुर्ण टिम यांनी अहोरात्र जागून, झारखंड येथील पोलीसांशी समन्वय साधून तांत्रिक मदत करुन, आरोपी ताब्यात घेतले व अपहृत झालेला इसमाची सुखरुप सुटका केली.