No icon

भडगाव प्रतिनिधी

प्रतापराव हरी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रम उत्साहात संपन्न

     (कार्यक्रमाला पाचोरा-भडगावकर व परिसरातील खेड्यांतील प्रेक्षकांची अलोट गर्दी)

   भडगांव (प्रतिनिधी) कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २३ व्या पुण्यस्मरण सप्ताह अंतर्गत व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त भडगाव येथील डीटीएड कॉलेजच्या प्रांगणात अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा व महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जोपासणारा _गर्जा महाराष्ट्र माझा_ हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. 
या कार्यक्रमाचे प्रतिमापूजन दिपप्रज्वलन व उद्घाटन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, संस्थेच्या उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका ताईसाहेब डॉ पुनमताई प्रशांतराव पाटील, ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई येथील उपसचिव प्रशांतराव विनायकराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्रशांतराव विनायकराव पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जयवंतराव बागल, दिलीप ठाकरे, संस्थेचे समन्वयक तसेच लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर या शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे सर व लाडकुबाई विद्यालयाच्या प्राचार्य वैशाली पाटील मॅडम यांची उपस्थिती होती.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाचोरा व भडगाव तालुक्यातील भव्य भजन गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण व भव्य अशा मंगळागौर स्पर्धेच्या विजेत्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. विजेत्यांचा सन्मान प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व बक्षीसाची रक्कम देऊन करण्यात आला.
भव्य भजन गीत गायन स्पर्धेचा निकाल 


प्रथम  ( विभागून ) सिद्धेश्वर भजनी मंडळ शिंदाड 
प्रथम
जय बाबाजी भजनी मंडळ, नगरदेवळा


द्वितीय 
महादेव भजनी मंडळ, नांद्रा


तृतीय - 
ज्ञानसागर वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल, भडगाव 


उत्तेजनार्थ
साधना भजनी मंडळ, भडगाव 


उत्तेजनार्थ महिलांसाठी 
स्वरांजली महिला भजनी मंडळ, भडगाव
शारदा महिला भजनी मंडळ, भडगाव 


उत्कृष्ट वेशभूषा
श्रीराम भजनी मंडळ, भडगाव 


उत्कृष्ट वादन 
जय जनार्दन भजनी मंडळ, निंभोरा


उत्कृष्ट गायन 
साधना भजनी मंडळ, भडगाव 


श्री प्रशांत सोळंकी
  मंगळागौर स्पर्धेचा निकाल


 प्रथम 
स्वरांजली ग्रुप भडगाव 


 द्वितीय 
मधवानंद ग्रुप भडगाव 


 तृतीय 
संत नामदेव महाराज कलाविष्कार ग्रुप भडगाव

      बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमानंतर कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या वतीने शाळा विकास निधी साठी संस्थेच्या सर्व शाळांमधून दोन शाळांच्या चिठ्ठ्या काढून २ लाख ११ हजार १११ रुपयेची रक्कम शाळेच्या विकासासाठी माननीय चेअरमन नानासाहेब श्री प्रतापराव हरी पाटील यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त भेट देण्यात येते. जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड व माध्यमिक विद्यामंदिर भातखंडे या दोन शाळांना विभागून ही रक्कम देण्यात आली.
       बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सीमालवाडी गावातील गुरुमाऊली ग्रुप प्रस्तुत गर्जा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमाला सुरुवात झाली. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. भडगाव -पाचोरा शहरातील व तालुक्यातील अनेक गावांमधून नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. सुमारे चार तास चाललेल्या या कार्यक्रमाने महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा व चालिरीतींवर प्रकाश टाकुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
     त्यात गर्जा महाराष्ट्र या गीताने सुरुवात झाली. पिंगळा,वासुदेव,मंगलमय पहाट,गौरी गणपतीच्या आगमनावर आधारित गीत,मंगळागौर,अभंग,दिंडीचे सादरीकरण,शेतकऱ्यांवर आधारित गीत,भारुड,कोळी, ढोलकी वादन, गीत,पोतराज,वाघ्या मुरळीचा जागर, लावणीची जुगलबंदी,धनगरांचे गजा नृत्य,जागरण गोंधळ, शेवटी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांना महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्याचे आवाहन करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक भोसले यांनी केले व आभार मानले.
   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे सर्व शाखांचे प्राचार्य,मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी अनमोल सहकार्य केले.

Comment As:

Comment (0)