No icon

Daksh Police Times

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान......

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होतय .

मुंबईत मतदानानिमित्त पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. 5 अप्पर पोलीस आयुक्तांसह 25 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

दिग्गजांचं भविष्य मतदारांच्या हातता

राज्यातील ज्या मतदारसंघात निवडणूक होणाराय, त्यामध्ये मुंबईतील 6 तसंच ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, धुळे, दिंडोरी या मतदारसंघांचा समावेश आहे. पियूष गोयल, भारती पवार, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे आदी दिग्गजांचं भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा आहे. या टप्प्यानंतर सर्वांनाच उत्सुकता असेल ती 4 जूनच्या निकालाची.

मुंबईत निवडणूक आयोगाकडून जनजागृती मोहीम

महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मुंबईमध्ये दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई हे 2 मतदारसंघ येतात. तर 2520 मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. त्यामुळे मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यासाठी वाहने देखील तैनात आहेत. उन्हाचा कडाका लक्षात घेता मतदान केंद्रावर मंडपाची सोय तसेच पिण्याच्या पाण्याची सोय केलीये. दिव्यांग मतदारांसाठी रॅमची तसंच विल चेअरची सोय केलीये..मात्र मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यासाठी बंदी केली. मुंबईत 111 वर्षाच्या आजी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाला अगदी काही तासच उरलेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत निवडणूक आयोगाकडून जनजागृती मोहीम राबवण्यात आली. त्याचाच भाग म्हणून फ्लॅश मॉबच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करण्यात आलं.

महिला सबलीकरणासाठी सखी बुथचं नियोजन

निवडणूक आयोगाचा महिला सबलीकरणासाठी सखी बुथचं नियोजन केलंय..महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पाडलं जाणारे. यासाठी निवडणूक आयोगाने विशेष तयारी केलीये.. महिलांसाठी एक विशेष सखी बुथ तयार करण्यात आलायं... यामध्ये बुथ प्रमुखापासून सर्व कर्मचारी वर्ग हा महिलांचा असणारे. या सखी बुथला गुलाबी रंगानं आणि गुलाबी फुलांनी सजवलयं...

Comment As:

Comment (0)