No icon

Daksh Police Times

शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर पावसात रोड शो केला.

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील  महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोड शो केला. मात्र, सायंकाळच्या या रोड शोच्या वेळी अचानक जोरदार पाऊस कोसळू लागला. मात्र, अजित पवारांनी न थांबता रोड शो सुरूच ठेवला. कोंढवा, लुल्लानगर , साळुंखे विहार , कौसरबाग, कात्रज गावठाण , कात्रज चौक , सुखसागर नगर , कोंढवा बुद्रूक , गोखलेनगर आदी परिसरात हा रोड शो झाला. रोड शो ला परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.

पुण्यातील हडपसर परिसरातीलउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या रोड शो ला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी शिवाजी आढळराव पाटलांना यांना मोठे मताधिक्य देण्याचे आवाहन केले. आमदार चेतन तुपे, योगेश टिळेकर , नाना भानगिरे ,साईनाथ बाबर उपस्थित होते.

 

यावेळी अजित पवार म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो आहोत. पावसात आम्हाला भिजायची सवय आहे. त्यामुळे पावसात रोड शो करण्याचे फार विशेष नाही. लोकांना आमच्याबद्दल विश्वास वाटतो, त्यामुळे पावसात एवढे लोक रोड शोला आले आहेत..

 

अजित पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे थोर विकास पुरुष आहेत.
त्यांनी देशाचा विकास गतिमान केला. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे भारताला जगात मानाचे स्थान मिळाले.
अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर गेली. ती तिसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे.
देशाच्या विकासासाठी मोदींच्या नेतृत्वाखालील महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला.

कार्यकर्त्यांना बजावताना अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या ठराविक लोकांनी काम करून चालणार नाही,
तर तळागाळातील कार्यकर्त्यांनी देखील काम केले पाहिजे. इमाने इतबारे काम करावे. कोणीही गंमत-जंमत करायचा
प्रयत्न करू नका. अन्यथा तुमचा बंदोबस्त करावा लागेल.

Comment As:

Comment (0)