No icon

Daksh Police Times

विजय शिवतारे शिंदे सेना सोडण्याच्या तयारीत, बारामतीत लढणारच, म्हणाले…

बारामती : Vijay Shivtarea On Baramati Lok Sabha | महायुतीकडून (Mahayuti) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar NCP) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरूद्ध शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यात बारामती लोकसभेची लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, येथे महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) नेते विजय शिवतारेंनी अजित पवारांची डोकेदुखी वाढवली आहे. शिवतारे बारामतीत पवारांच्या विरूद्ध निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. दरम्यान, अजित पवारांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर शिंदे गटाकडून शिवतारे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार असल्याची चर्चा होती. पण, आता शिवतारे यांनीच शिंदेंना अडचण झाली तर बाहेर पडेन, असे म्हणत निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.(Vijay Shivtarea On Baramati Lok Sabha)

विजय शिवतारे म्हणाले, माझे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घनिष्ठ नाते आहे. हे दोन-चार महिने त्यांना आता अडचण झालेली आहे. मला तर निवडणूक लढवायची आहे. महायुतीची सीट आपल्याला सुटत नाही. अशा परिस्थितीत त्यांना अडचण आहे, म्हणून मी बाहेर पडेन.

विजय शिवतारे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतची अटॅचमेंट २५ वर्षांपासूनची आहे. ती कायम असणारच आहे. माझ्यावर कारवाई होईल, अशा बातम्या सगळीकडे होत्या. त्यामुळे पुढे काय होते, ते पाहू. उगाच कपोलकल्पित गोष्टींवर उत्तर देणे योग्य नाही.

 

शिवतारे म्हणाले, महाविकास आघाडीविरोधात माझी लढत होईल.
विजय शिवतारे अपक्ष आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे अशीच लढत होईल.
हजार टक्के विश्वास आहे की, पहिल्या क्रमांकाची मते मला मिळतील.
आज काय झाले आहे की, हाही तसाच आणि तोही तसाच अशी परिस्थिती आहे.
त्यामुळे लोकांना मला उभे राहण्याचा आग्रह केला आहे.

शिवतारे म्हणाले, एका बाजूला सुप्रिया सुळे आणि दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार.
लोकांची भावना अशी आहे की, आम्हाला या दोघांनाही मत द्यायचे नाही. त्यामुळे मग तिसरा पर्याय काय आहे.
जेव्हा महाराष्ट्रात लोकांना चांगले पर्याय लोकशाहीत मिळतील, तेव्हा नक्कीच चमत्कार होईल, असे शिवतारे म्हणाले.

Comment As:

Comment (0)