No icon

Pune : Daksh Police Times

ज्या महिलेसाठी वाहतूक पोलिसाने स्वतःवर हल्ला झेलला त्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे; सुखदेव पाटीलांचे आवाहन

मद्यधुंद रिक्षाचालकाने युनिफॉर्म वर्दी मध्ये असलेल्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उल्हासनगरात घडली होती 

उल्हासनगर : मद्यधुंद रिक्षाचालकाने युनिफॉर्म वर्दी मध्ये असलेल्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उल्हासनगरात घडली होती. या घटनेवर विठ्ठलवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी वेगळी  माहिती दिली असून महिलेला रिक्षा चालकाच्या तावडीतून सोडवताना वाहतूक पोलीस हवालदार मोहन पाटील यांनी स्वतःवर हल्ला झेलला आहे.


ही कामगिरी कौतुकास्पद असून महिलेने तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन सुखदेव पाटील यांनी केले आहे. पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी विनापरवाना गाड्या, सीटबेल्ट आदींची चेकिंग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस हवालदार मोहन पाटील, पोलीस नाईक चव्हाण, वॉर्डन सतीश खडतरे हे छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल येथे चेकिंग करत होते. तितक्यात एकाने पदे रिक्षाचालक महिलेची छेड काढत असल्याचे सांगितले 

 

विशेष म्हणजे ती आमची हद्द नसतानाही मोहन पाटील व त्यांचे सोबती तिथे गेले. आणि त्या महिलेला वाचवत असतानाच रिक्षाचालकांनी मोहन पाटील यांच्यावर हल्ला चढवला. मात्र ज्या महिलेसाठी मोहन पाटील यांनी स्वतःवर हल्ला झेलला ती महिला तिथून निघून गेली. या महिलेचा सीसीटीव्ही कॅमेरे तपासून शोध घेण्यात येत असून संबंधित महिलेने तक्रारीसाठी पुढे यायला हवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी सांगितले. मध्यवर्ती पोलिसांनी याप्रकरणी दोन रिक्षाचालकांना ताब्यात घेतले आहे. 
 


 

Comment As:

Comment (0)