No icon

Daksh Police Times

जळगाव जामोद येथील वनपाल याला दहा हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

बुलडाणा :गुन्हा दाखल असलेला व्यक्ती आरोपी म्हणून सिद्ध न व्हावा, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद येथील वनपाल याला दहा हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.6) वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय (प्रादेशिक), जळगाव जामोद येथे करण्यात आली. याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात (Police Station in Jamod Buldhana) गुन्हा दाखल करण्यात आला. (Buldhana Bribe Case)

याबाबत जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा येथे राहणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीने बुलढाणा एसीबीकडे तक्रार केली आहे. त्यानुसार वनपाल शेख कलीम शेख बिबन (वय 48 रा. उमाळी ता. मलकापूर जि. बुलढाणा सध्या रा. कृष्णा नगर, जळगाव ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोर वनपालाचे नाव आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, जळगाव जामोद येथे वनविभागाच्या अखत्यारितील सालई गोंद अवैधरित्या जमा केल्याने एकावर गुन्हा दाखल होता. त्या व्यक्तीविरुद्ध आरोप सिद्ध न व्हावा, यासाठी वनपाल शेख कलम शेख बबन याने दहा हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत एसीबी कार्यालयाकडे तक्रार झाली होती. (ACB Trap Case)

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता शेख यांनी तक्रारदार यांचेकडे 10 हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्यास संमती दिली.
त्यावरून सापळा कारवाई आयोजित केली असता आरोपी शेख यांनी पंचासमक्ष लाच रक्कम स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
आरोपी शेख विरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक मारुती जगताप,
अपर पोलीस अधिक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शितल घोगरे,
पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक शाम भांगे,
पोलीस अंमलदार प्रवीण बैरागी, विनोद लोखंडे, जगदीश पवार, रंजीत व्यवहारे,
चालक नितीन शेटे, चालक अरशद शेख यांच्या पथकाने केली.

Comment As:

Comment (0)