No icon

Daksh Police Times

पिंपरी : पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली , पिस्टल जप्त.

पिंपरी :  बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या आरोपीकडून 25 हजार रुपयांचे पिस्टल जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.1) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटीलनगर येथे केली.

आदित्य कालीदास थोरात Aditya Kalidas Thorat (वय-22 रा. चिंचेचा मळा, चिखली, मुळ रा. चांडवली, ता. आंबेगाव)
असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर एका अल्पवयीन मुलावर भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत
गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे (वय-43) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्र बागळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत होते.
त्यावेळी पोलीस पथकाला पाटीलनगर येथील राममंदीरासमोर दोन जण थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने त्याठिकाणी जाऊन आरोपी आदित्य थोरात याला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीचे पिस्टल जप्त केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Comment As:

Comment (0)