No icon

Daksh Police Times

ऑनलाईन क्रिकेट सट्टा घेणारी टोळी खंडणी विरोधी पथक १ च्या जाळ्यात

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांच्या आदेशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक १ कडील अधिकारी व अंमलदार कोथरूड भागात पेट्रोलिंग करत असताना सपोफौ प्रविण ढमाळ व पोहवा / अमॉल आवाड यांना मुसारी कॉलनी येथील पटेल टेरेस या सोसायटीमध्ये ऑनलाईन क्रिकेट सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली. सदर बातमीची पडताळणी करून मा. वरिष्ठांच्या परवानगीने पटेल टेरेस, फ्लॅट नं.५. मुसारी कॉलनी, कोथरूड येथे सापळा रचून आरोपी नामे १) मुकेशकुमार शैलेंद्रप्रसाद साहू वय २४ वर्षे २) देवेंद्र कमलेशकुमार यादव वय २१ वर्षे ३) जसवंत भुषणलाल साहू वय २२ वर्षे ४) राहूलकुमार गणेश यादव वय ३० वर्षे ५) रोहितकुमार गणेश यादव वय २६ वर्षे ६) दुष्यंत कोमलसिंह सोनकर वय २३ वर्षे ७) संदिप राजु मेश्राम वय २१ वर्षे ८) आखिलेश्वर कृपाराम ठाकूर वय २४ वर्षे ९) मोहम्मद ममनुन ईस्माईल सौदागर वय ३२ वर्षे सर्व रा. भिलाई, छत्तीसगड १०) अमित कैलास शेंडगे वय ३२ वर्षे रा.स.नं.१२० किश्किंदानगर, पौड रोड, संदिप सायकल मार्टजवळ, कोथरुड, पुणे असे एकूण १० आरोपीना ताब्यात घेवून १६ मोबाईल व २ लॅपटॉप असा एकूण २,२०,५००/- रू कि चा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्याविरुद्ध सपोफी प्रविण डमाळ यांचे फिर्यादी वरून कोथरूड पो. ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास खंडणी विरोधी पथक १ चे सपोनि अभिजीत पाटील हे करत आहेत.

सदरची कारवाई मा अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. शैलेश बलकवडे, ना. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे, ना. सहायक पोलीस आयुक्त १, गुन्हे श्री. सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखेचे कातीकुमार पाटील यांच्या सुचनेप्रमाणे सपोनि अभिजीत पाटील, पोउपनिरी यशवंत ओबासे, पोलीस अंमलदार प्रविण ढमाळ, अमोल आवाड, मधुकर तुपसीदर, संजय भापकर, सवाजी चव्हाण, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लाडने, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार व संभाजी गंगावणे यानी केली आहे.

Comment As:

Comment (0)