No icon

Dhule : Daksh Police Times

धुळ्यात ‘हिस्ट्रिशीटर्स’ची आज हजेरी : पोलिस अधीक्षक धिवरे

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारींतर्गत जिल्हा पोलिस प्रशासनाने विविध उपाययोजनांना वेग दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारींतर्गत जिल्हा पोलिस प्रशासनाने विविध उपाययोजनांना वेग दिला आहे. यात जिल्हाभरातील सर्व पोलिस ठाण्यांत बुधवारी (ता. ७) एकूण दोनशेहून अधिक गुन्हेगार, संशयित, समाजकंटकांची हजेरी घेत अधिकाऱ्यांनी त्यांना कायदा व सुव्यवस्थेविषयी सूचक तंबी दिली.

दरम्यान, जिल्ह्यातील १४८ ‘हिस्ट्रिशीटर्स’ची गुरुवारी (ता. ८) पोलिस अधीक्षक कार्यालयात सकाळी दहानंतर परेड घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. (Superintendent of Police Dhiware statement Todays presence of History Sheeters in Dhule news)

तीन वर्षांपासून पोलिसांच्या अधिकार क्षेत्रातील शारीरिक दुखापत करणारे आरोपी, जे निवडणुकीच्या कालावधीत कायदा हातात घेऊ शकतात असे आरोपी.

संशयित, गुन्हेगार, समाजकंटक, मागील तीन वर्षांतील आरोपींचे गटातील वैरभाव आणि पूर्वी ८० व आता १४८ झालेले हिस्ट्रिशीटर्स अशा सर्वांना वठणीवर आणण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

त्यात प्रतिबंधात्मक कारवाई करणे, तंबी देणे यासह विविध प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. याअंतर्गत जिल्ह्यातील १७ पोलिस ठाण्यांत बुधवारी दिवसभरात दोनशेहून अधिक गुन्हेगार, संशयित, समाजकंटकांची परेड घेऊन त्यांना सूचक तंबी देण्यात आली.

 

Daksh Police News

Comment As:

Comment (0)