No icon

Pune : Daksh Police Times

वृध्द महीलेच्या गळ्यातील जबरदस्तीने सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन चोरी


वृध्द महीलेच्या गळ्यातील जबरदस्तीने सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन चोरी करणाऱ्या आरोपीच्या सिंहगडरोड पोलीसांनी आवळल्या मुसक्या
सदर बाबत अधिक माहिती अशी की, दि.१२/०९/२०२४ रोजी स्वामी नारायण मंदिर परीसरातुन एका वृध्द महिलेस पत्ता विचारण्याचा बहाणा करुन तिचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून चोरी करुन घेवुन गेल्याने सिंहगडरोड पोलीस स्टेशन येथे दोन अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेच्या अनुषंगाने मा. पोलीस उप आयुक्त सो परि-३ पुणे शहर श्री संभाजी कदम साो, व सहाय्यक पोलीस आयुक्त साो सिंहगड रोड विभाग, श्री अजय परमार, व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, राघवेंद्रसिह क्षीरसागर, सिंहगड रोड पोलीस ठाणे पुणे, मा. पोलीस निरीक्षक अतुल भोस (गुन्हे), यांनी तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, सचिन निकम, व त्याचे पथकास सदरचा गुन्हा उघड करण्याबाबत सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील तपास पथकाचे अधिकारी सचिन निकम व पोलीस अंमलदार असे दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपीचा गुप्त बातमीदारामार्फत, तांत्रिक विश्लेषणाव्दारे, व सी.सी.टि. व्ही फुटेज तपासुन आरोपीचा शोध घेत असताना, दिनांक २८/०९/२०२४ रोजी सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार देवा चव्हाण, व पोलीस अंमलदार अमोल पाटील, यांना त्यांचे खास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा जेएसपीएम कॉलेज वाघोली समोरील काही अंतरावरील बिल्डींग जवळ थांबलेला आहे त्याने अंगात चौकडी निळसर रंगाचा व काळ्या रंगाची साधी पॅन्ट घातलेली, डोक्याचे केस वाढलेले अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता, त्यांनी सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर यांना कळविली. मा. वरिष्ठांनी सदरच्या बातमीची खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, यांना त्याचे सोबत नमुद स्टाफ सह रवाना केले असता सदर मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन बातमीतील ठिकाणाजवळ येवुन थोडे अली कडे थांबुन सापळा रचुन बातमीतील वर्णनाचा इसम आहे का? याबाबत खात्री केली असता बातमीतील वर्णनाप्रमाणे एक इसम मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव ओम महादेव यादव वय १९ वर्षे रा. हनुमान मंदिर जवळ कोरडेवाडी ता. केज जि. बीड सध्या रा.बकोरी फाटा जेएसपीएम कॉलेज जवळ, वाघोली पुणे. असे असल्याचे सांगितले त्याचेकडे दाखल गुन्हयातील जबरदस्तीने हिसकावुन चोरी करुन घेवुन गेलेले मंगळसुत्राबाबत अधिक तपास केला असता त्याने दाखल गुन्हयातील चोरी केलेले १ लाख रुपये किंमतीचे २१.४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हे आरोपीने त्याचे घरामध्ये लपवुन ठेवल्याचे सांगितल्याने सदरचे सोन्याचे मंगळसुत्र हे जप्त करण्यात आले असुन त्यास सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ५०५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५) या गुन्ह्यात दि.२८/०९/२०२४ रोजी २२/०० वा अटक करुन त्यास मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत. सदरची कामगिरी श्री अमितेश कुमार सो पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. संभाजी कदम सो, मा.पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३, पुणे शहर, श्री अजय परमार सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री. राघवेंद्रसिंह क्षीरसागर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. अतुल भोस पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिंहगडरोड पो स्टे पुणे. यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, श्री संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, पंकज देशमुख, विकास बांदल, अमोल पाटील, देवा चव्हाण, विकास पांडोळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, यांचे पथकाने केली,
 

Comment As:

Comment (0)