No icon

Pune : Daksh Police Times

नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) इंन्जेक्शनची बेकायदेशिरपणे विक्री करणारा हडपसर पोलीसांचे जाळ्यात


दिनांक १३/०९/२०२४ रोजी तपासपथक प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, यांना प्राप्त गुप्त बातमी वरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन श्री. संतोष पांढरे, यांच्या आदेशाने अर्जुन कुदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महेश कवळे, पोलीस उप-निरीक्षक आणि तपासपथक अंमलदार दिपक कांबळे, निलेश किरवे, अभिजीत राऊत, यांचे सह मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने छापा कारवाई करून संशयीत इसम ओकांर अंगद बिनवडे, वय २१ वर्षे, रा. प्रगती नगर, गल्ली नंबर ३, काळेपडळ रोड, हडपसर यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यात असलेल्या पिशवीमध्ये MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP चे बाटल्या मिळून आल्या. त्याबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याने सदरचे औषध हे नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन ६००/- ते ७००/- रुपयाला विक्री करत असल्याचे सांगितले. आरोपीचे ताब्यात MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP चे एकुण ३९ बाटल्या किं. रू १५.५६१/- एम.आर.पी नुसार तसेच बाजारभावानुसार २५,०००/- किं. रू चा माल मिळून आला आहे.
आरोपी ओंकार अंगद बिनवडे, याचेकडे कोणताही औषध विक्री परवाना नसताना, सदरचे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसताना, सदर औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होवुन, औषध घेणाया व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होवु शकते हे माहित असताना सुध्दा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्रीकरिता आपले कब्जात घेवुन मिळून आल्याने हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं १४४७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७५, २७८. १२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ श्री.आर राजा, यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अश्विनी राख वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, श्री. संतोष पांढरे, पोनि (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, दिपक कांबळे, निलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, अतुल पंधरकर, अमित साखरे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, अभिजीत राऊत, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Comment As:

Comment (0)