No icon

Pune : Daksh Police Times

प्राणी फाउंडेशन संस्थेच्या गोरक्षक चांदवड यांनी अवैधरित्या गोवंशाची तस्करी करणाऱ्या ट्रकला पकडून गाईंना जीवदान दिले आहे

चांदवड: चांदवड हद्दीतील आडगाव टप्पा येथे अवैधरित्या गोवंशाची तस्करी करणाऱ्या ट्रकला प्राणी फाउंडेशन संस्थेच्या गोरक्षक चांदवड ,लासलगाव, देवळा व ताराबाद येथील सदस्यांनी पाठलाग करून वणी येथून ट्रक मध्ये 30 गोवंश अवैधरित्या बांधून कत्तलीच्या उद्देशाने मालेगाव येथे नेत असताना चांदवड ते आडगाव टप्प्याच्या दरम्यान ट्रक पकडून गाईंना जीवदान दिले आहे. सदर ट्रक व वाहतूक करणारे इसम चांदवड पोलीस पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व कर्मचारी  मन्साराम बागुल, बसते, जाधव यांनी कारवाई करत सर्व गोवंश प्रजातीच्या जनावरांना मालेगाव येथील मुंगसे पाठवले असून पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व कर्मचारी करीत आहे

Comment As:

Comment (0)