No icon

Pune : Daksh Police Times

सिंहगड रोड पोलीसांनी घरफोडीतील सराईत गुन्हेगार यांना अटक करुन त्यांच्याकडुन १९,२०,०००/- रुपयेचा मुद्देमाल केला जप्त.

 

सदर बाबत अधिक माहिती अशी की, दि.२८/०४/२०२४ रोजी मधुरा बंगला सफलानंद सोसायटी, संतोष हॉल जवळ आनंदनगर, सिंहगड रोड पुणे. येथे झालेल्या घरफोडी गुन्हयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मा. पोलीस उप-आयुक्त सौ। परि मंडळ-०३ पुणे शहर याचे मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे कडील तपास पथकातील अधिकारी सपोनि सचिन निकम व पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर असे तपास पथकाची दोन पथके तयार करुन गुन्ह्याचा तपास करीत होते.

तपास पथकातील अधिकारी व अंमलदार अज्ञात आरोपी याचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार देवा चव्हाण, राहुल ओलेकर, सागर शेडगे, अमोल पाटील यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मधुरा बंगला सफलानंद सोसायटी, संतोष हॉल जवळ आनंदनगर, सिंहगड रोड पुणे. येथे घरफोडी चोरी करणारे इसम तुकाईनगर संर्कल वडगाव पुणे येथे थांबले आहेत. अशी बातमी मिळाल्याने आम्ही सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने आम्ही वरील नमुद स्टाफ सह तुकाईनगर सर्कल वडगाव पुणे येथुन खाजगी वाहनाने बातमीतील ठिकाणाजवळ येवुन थोडे अली कडे थांबुन बातमीतील इसम आहेत का याबाबत खात्री केली असता बातमी प्रमाणे दोन इसम थांबलेले दिसले. सदर दोन्ही इसमांना आमची येण्याची चाहुल न लागू देता त्यांस आहे त्या परिस्थीतीत वरील स्टाफचे मदतीने दि.०३/०५/२०२४ रोजी ०७.३० वा. ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव व पत्ता १) संकेत प्रकाश निवंगुणे वय- २३ वर्षे रा. बानगुडे चाळ संघर्ष चौक, यशोदिप सोसायटी वारजे माळवाडी पुणे. २) सुरज शिवाजी भरडे वय २४ वर्षे रा. शिवसाईनगर ग.नं. २४ पाण्याचे टाकीजवळ, सुतारदरा कोथरुड पुणे. असे सांगितले. त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी मधुरा बंगला सफलानंद सोसायटी, संतोष हॉल जवळ आनंदनगर, सिंहगड रोड पुणे. येथे घरफोडी केल्याचे सांगितले.

आरोपी यांना दाखल गुन्ह्यांत अटक करुन त्यांच्याकडे गुन्ह्यांचा अधिक तपास करता त्यांनी चोरीच्या गुन्ह्यातील मिळालेले सोन्याचे दागिने हे त्याचा साथीदार लक्ष्मण आण्णा जाधव वय ३८ वर्षे रा. हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती, लेन नंबर ३ कोथरुड पुणे. याचे कडे विक्री करण्यासाठी दिले असल्या बाबत सांगितले होते. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी यांच्याकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास करता त्यांनी गुन्ह्यातील गेले मुद्देमाला पैकी खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १) १९,२०,०००/- रुपये किंमतीचे चोरी गेलेल्या मुद्देमाला पैकी ३७ तोळे वजनाचे सोने, हिरे, पाचु २) ३०,०००/- रुपये किंमतीची चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली चोरीची दुचाकी मोटार सायकल.

१९,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल अटक आरोपी यांच्याकडुन जप्त करण्यात आला आहे.

* घरफोडी चोरीच्या अनुषंगाने नागरीकांना अहवान करण्यात येते की, १) आपल्या कडील सोन्या चांदीचे दागिणे व मौल्यवान वस्तु या घरी न ठेवता बँकेतील लॉकर मध्ये ठेवावे. २) बाहेर गावी

जाताना शेजारील राहणाऱ्या लोकांना सांगुन जावे. ३) आपण राहत असलेल्या सोसायटी, बंगला, कॉम्प्लेक्स मध्ये येणारा व जाणारा मागावर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात यावे.

सदरची कामगिरी श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री प्रविण पवार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. संभाजी कदम सोो, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३, पुणे शहर, श्री भिमराव टिळे सो, सहा पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग अतिरिक्त कार्यभार-सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री. विजय कुंभार सो, वरीष्ठ वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री राघवेंद्रसिंह क्षीरसागर पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, श्री संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, यांचे पथकाने केली.

 

Comment As:

Comment (0)