No icon

Daksh Police Times

पुर्ववैमनस्यातून खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश के.पी.नांदेडकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

पुणे : पुर्ववैमनस्यातून छातीवर चाकूने वार करून खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश के.पी.नांदेडकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल मंगळवारी (दि.16) जाहीर करण्यात आला. अश्विन विकास गवळी, रिझवान मोहम्मद अन्सारी असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. हा प्रकार जून 2018 रोजी घोरपडे पेठेतील शिवाजी रोडवर Shivaji Road Pune  घडला होता.(Pune Crime News)

याप्रकरणी खडक पोलिसांनी आयपीसी 302, 201, 341, 404 नुसार गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली. अश्विन गवळी याला भादवि 302 कलमांतर्गत जन्मठेप व 10 हजार रुपये दंड व न भरल्यास सहा महिने शिक्षा तसेच भादंवि कलम 201 मध्ये दिड वर्षे साधी कैद व 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद, भादंवि कलम 341 मध्ये रुपये एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 8 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. तर आरोपी रिझवान अन्सारी याला भादंवि कलम 404 मध्ये दीड वर्षे साधी कैद व रुपये 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद सुनावण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वाडेकर यांनी सरकारची बाजू न्यायालयात मांडली. प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी कोर्टाचे कामकाज पाहिले. तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार प्रमोद धिमधिमे काम पाहिले त्यांना कोर्ट अंमलदार सुहास डोंगरे यांनी कामकाजात मदत केली.

Comment As:

Comment (0)