No icon

Pune : Daksh Police Times

पिंपरी : स्वतःच्या घरात वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या महिलेला अटक, दोन महिलांची सुटका

Daksh Police Times : Pimpri Chinchwad Crime Branch | महिलांना पैशांचे आमिष दाखवून (Lure Of Money) स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय (Prostitution Racket) करून घेणाऱ्या दलाल महिलेवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (Pimpri Chinchwad Police AHTU) कारवाई केली. पोलिसांनी महिलेच्या ताब्यातून दोन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.1) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास सेवन स्टार सिटी, मारुंजी येथे करण्यात आली.

पोलिसांनी संबंधित दलाल महिलेला अटक केली आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार सुधा अशोक टोके (वय-46) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेवर आयपीसी 370 (3) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत हिंजवडी परिसरात फ्लॅट मध्ये महिला दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना स्वतःच्या फ्लॅट मध्ये ठेऊन मुलींना जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत आहे, अशी माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने मारुंजी येथील माऊली क्लासिक बिल्डिंग,सेवन स्टार सिटी मधील फ्लॅट नं. 103 येथे अचानक छापा टाकला. त्यावेळी आरोपी दलाल महिलेच्या ताब्यातून दोन पीडित मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार, सुनील शिरसाट, मारुती करचुडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके, संगीता जाधव, सोनाली माने यांच्या पथकाने केली

Comment As:

Comment (0)