No icon

Daksh Police Times

घरगुती गॅस सिलेंडर मधुन अवैध रित्या लहान सिंलेडर टाक्यामध्ये गॅस भरताना सिंहगड रोड पोलीसांनी टाकली धाड दोन आरोपींना केले जेरबंद

दर बाबत अधिक माहिती अशी की, दि. २४/०३/२०२४ रोजी सपोनि सचिन निकम, पोउपनिरी संतोष भांडवलकर, पोहवा २४६ तारु, पोशि ८३४२ पाटील, पोशि १०२१५ मगर, पोशि ७२७५ बांदल, पोशि ८६९० पांडोळे, पोशि ८६०० चव्हाण असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे तपास पथक कार्यालयात हजर असताना देवा चव्हाण यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, लेन २९ (ए) गारवा बिर्याणी दुकानाच्या समोर धायरी पुणे येथील एका रूम मध्ये काही इसम है अनाधिकृत पणे स्वतःचे आर्थिक फायद्या करीता सिंल बंद गॅस सिलेडर मधुन लॉखडी रिफिल पाईप च्या सहाय्याने रिकाम्या गैस सिलेंडर मध्ये गैस रिफिल करुन पुन्हा सिल बंद करुन त्यांची विक्री करीत आहेत. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी आम्ही आमचे सोबतचे सपोनि निकम यांना कळविली असता त्यांनी सदरची बातमी मा. वरिष्ठांनी कळविली असता मा. वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे मुखजल आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या विकाणी जावुन बातमी प्रमाणे खात्री करता बातमीतील ठिकाणी दोन इसम हे त्यांचे पत्र्याचे रुम मध्ये घरगुती सिलबंद गॅस सिलेडर मधुन नॉबच्या सहाय्याने दुसऱ्या रिकाम्या लहान गैस सिलेडर मध्ये रिफिल करीत असताना दिसल्याने सदर ठिकाणी दि. २४/०३/२०२४ रोजी १३/३० वा. अचानकपणे छापा मारला असता सदर ठिकाणी दोन इसम मिळुन आले त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव १) आशिष अशोक मोरे वय २७ वर्षे रा. आकाश दिप कॉम्प्लेक्स प्लॅट नं १०२ धायरी पुणे व २) अमर सुर्यकांत शेडोळे वय- २५ वर्षे रा. लेनं २९ ए गणेशनगर धायरी पुणे मुळ गाव मुपो आंबी सांगवी ता भालकी जि बिदर राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले नमुदचे इसम हे घरगुती गॅस हा नॉबच्या सहाय्याने त्यांच्याकडील लहान टाक्यामध्ये रिफिल करुन तो बाजारात अवैधपणे विक्री करीत असल्याने घटनास्थळावर त्याचे जवळ लहान व मोठे २८ गॅस सिलेंडर एक वजन काटा, नॉब, रेग्युलेटर असलेला गॅस पाईप, पाना, दोन स्क्रू डायव्हर, असा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपी यांचे विरुध्द सिंहगड रोड पो स्टेशन गुन्हा रजि नं १७६/२०२४ भा दं वि कलम २८५,३४ तसेच जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ अन्वये दाखल करण्यात आला असुन पुढील अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री अमितेश कुमार साो पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री प्रविण पवार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. संभाजी कदम सो, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३, पुणे शहर, श्री भिमराव टिळे सोो, सहा पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग अतिरिक्त पदभार सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री. विजय कुंभार साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड पो स्टे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, श्री संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, यांचे पथकाने केली.

Comment As:

Comment (0)