No icon

Pune : Daksh Police Times

पुणे जिल्ह्यातुन तडीपार असलेल्या रेकॉर्ड वरील सराईत आरोपीस अग्नीशस्त्रासह सिंहगड रोड पोलीसांनी केले जेरबंद.

सदर बाबत अधिक माहिती अशी की, दि.२०/०३/२०२४ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगड रोड पो स्टे पुणे व मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर याचे आदेशाने सिंहगड रोड पोलीस स्टेशन हाद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयीत इसम चेक करीत असताना सहा. पो फौजदार आबा उत्तेकर, पोहवा उत्तम तारु, पोशि शिवाजी क्षीरसागर यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम काळ्या रंगाचे त्यावर पांढऱ्या रंगाची डिझाईन असलेले जर्कीन व ग्रे रंगाची पॅन्ट घातलेली असुन त्याचे जवळ एक गावठी पिस्टल असुन सध्या त्यास पिंपरी चिंचवड आयुक्ताल येथुन तडीपार असुन तो जे.एस.पी. एम कॉलेजच्या समोरील रोड लगत नन्हे पुणे येथे थांबलेला आहे." अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सपोनि सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी ती मा. वरिष्ठांना कळविली असता मा. वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन बातमीप्रमाणे खात्री करता बातमीतील वर्णनाचा इसम सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसला. त्याची व आमची नजरा नजर होताच तो इसम त्या ठिकाणावरुन नजर चुकवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यास स्टाफचे मदतीने पाठलाग करुन काही अंतरावर त्याला शिताफीने पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आदेश ऊर्फ ऋषिकेश राम टेमकर वय-२१ वर्षे रा. सुसगाव सुवर्ण युग तरुण मित्र मंडळ गणपती मंदीराच्या मागे टेमकर वस्ती मुळशी पुणे असे सांगितले. त्याच्या बाबत अधिक चौकशी करता तो हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथील रेकॉर्ड वरील आरोपी असुन त्यास पुणे जिल्ह्यातुन एक वर्षा करीता तडीपार करण्यात आले असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे पॅन्टच्या आत मध्ये खोसलेले एक ५०,०००/-रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व पॅन्टचे खिश्यात १,०००/- रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे असा एकुण ५१,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन त्यास दि.२१/०३/२०२४ रोजी ०२/५० वा. अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक संतोष भाडंवलकर हे करीत आहे.

नमुद अटक आरोपी याचे विरुध्द खालील गुन्हे दाखल आहेत.

१) हिंजवडी पो स्टे गु.र.नं.४९१/२०२३

भादवि कलम ३२६,३२४,१४३,१४७,१४८, क्रिमीनल लॉ अमेंटमेट कलम ७

२) हिंजवडी पो स्टे गु.र.नं.६९४/२०२३ भादवि कलम ३२६,३२३,३४१,१०९,५०४,५०६,३४ आर्म

अॅक्ट कलम ४ (२५) मपोअधि. ३७ (१) सह १३५

३) हिंजवडी पो. स्टे.गु. र.नं. ५८५/२०२३ भादवि कलम ३२४,५०४,३४ ४) हिंजवडी पो स्टे गु.र.नं.७७२/२०१९ भादवि कलम ३२४,५०६ (२) ३४ आर्म अॅक्ट ४(२५)

मपोअधि. ३७ (१) १३५

सदरची कामगिरी श्री अमितेश कुमार साो पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री प्रविण पवार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील सोो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. संभाजी कदम सोो, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३, पुणे शहर, श्री भिमराव टिळे सो, सहा पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग अतिरिक्त पदभार सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री.

Daksh Police Times

Daksh Police News

 

Comment As:

Comment (0)