No icon

Pune : Daksh Police Times

गणेश ऊर्फ गुड्या अनिल पटेकर (टोळी प्रमूख) व त्याचे ०६ साथीदार यांचे विरुध्द मकोका अंतर्गत कारवाई

वारजे माळवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर

गणेश ऊर्फ गुड्या अनिल पटेकर (टोळी प्रमूख) व त्याचे ०६ साथीदार यांचे विरुध्द मकोका अंतर्गत कारवाई

यातील फिर्यादी हे नमुद ठिकाणी घरी झोपलेले असताना घराचे बाहेर दगड पडल्याचा आवाज आलेने घरातुन बाहेर आले त्यावेळी फिर्यादीचा मित्र नामे बाबु चव्हाण यांस अचानक चौकातील अमरजीत मुन्नासिंग व रोहन चव्हाण असे बाबु चव्हाण त्याची गचंडी पकडून त्याला निलू सोलापूरे याला का मारहाण केली असे विचारत हाताने मारहाण करीत होते ती भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी व त्यांची आई भाऊ व बाबु चव्हाणची आई असे गेले असता निल्लू सोलापूरे, योगेश करंजकर यांनी तुम्ही आमच्यामध्ये का येता असे म्हणत फिर्यादीच्या कपाळावर वीट मारून गंभीर जखमी केले. तसेच तेथे जमलेल्या लोकांना वाईट वाईट शिवीगाळ करुन, फिर्यादीस तुला उद्याचा सुर्य बघू देणार नाही अशी धमकी देवून, दगडफेक करुन, लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करुन जमलेल्या लोकांवर हत्यारे उगारून दहशत निर्माण करीत निघून गेले म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने वारजे माळवाडी पो.स्टे.गु.र.नं.७९/२०२४ भा.दं.वि. कलम ३२६,१४३,१४७,१४९.३३६.३२३,५०४, ५०६,४२७, आर्म अॅक्ट कलम ४(२५), सहसीनल, अमेंडमेंन्ट लॉ अॅक्ट कलम ७, मपोअधि कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान १) अमरजित मुन्ना सिंग वय २३ वर्षे रा. अचानक चौक, रामनगर, वारजे, पुणे (टोळी सदस्य) २) रोहन अनिल चव्हाण वय २५ वर्षे रा. सदर (टोळी सदस्य) ३) शुमवेल ऊर्फ दाद्या बाबुराव गायकवाड वय ३० वर्ष रा. विठ्ठल रुक्मीणी मंदिरासमोर, अचानक चौक, रामनगर, वारजे, पुणे (टोळी सदस्य) यांना अटक करण्यात आली असून १) गणेश ऊर्फ गुड्या अनिल पटेकर (टोळी प्रमूख) याचे सह एकुण ४ पाहिजे आरोपी आहे.

नमुद गुन्हयातील गणेश ऊर्फ गुड्या अनिल पटेकर (टोळी प्रमूख) यांने आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्ह्यात सामाईक साथीदार व नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करून अपराध केलेले असून यातील आरोपी यांनी खुन, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, दुखापत करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशिर शस्त्र जवळ बाळगणे, अपहरण करणे, जबरी चोरी करणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.

प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२).३ (४) चा अंतर्भाव करणे कामी वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मनोज शेडगे, यांनी पोलीस उप आयुक्त, परि ०३, पुणे शहर, श्री. संभाजी कदम यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील यांना प्रस्ताव सादर केलेला होता.

सदर प्रकरणाची छाननी करुन वारजे माळवाडी पो.स्टे.गु.र.नं.७९/२०२४ भा.दं.वि.कलम ३२६.१४३,१४७,१४९.३३६.३२३.५०४,५०६,४२७, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), सह क्रिमीनल अमेंडमेन्ट लॉ अॅक्ट कलम ७. मपोअधि कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२).३ (४) चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील यांनी मान्यता दिलेली आहे.

आहेत.

सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे, श्री भिमराव टेळे हे करीत

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. सहपोलीस आयुक्त पुणे शहर, श्री.प्रविण पवार, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि ३. पुणे शहर, श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर, श्री. भिमराव टेळे, यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मनोज शेडगे, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंदार शिंदे, तसेच पोलीस अमंलदार अतुल भिंगारदिवे, रामदास गोणते, गोविंद फड, किरण तळेकर, विजय खिलारी व नितीन कातुर्डे यांनी केलेली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुद्ध व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माणकरणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देणेबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. २०२४ या चालु वर्षातील मकोका अंतर्गत केलेली ही १६ वी कारवाई आहे.

daksh police times

Comment As:

Comment (0)