No icon

भडगाव प्रतिनिधी

रिपाई आठवले भडगाव तालुका अध्यक्ष खेडकर आण्णा यांनी आयोजित केलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्धेशिय संस्था यांच्या विद्यमाणे सामाजिक हित संवाद मेळावा संपन्न..

भडगाव येथे दि.27/9/2024 रोजी रिपाई आठवले तालुका अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउ्देशीय संस्था भडगाव अध्यक्ष खेडकर आण्णा यांनी आयोजित केलेल्या नारायण मंगल कार्यालय भडगाव येथे सामाजिक हित संवाद मेळावा नुकताच घेण्यात आला. पाचोरा भडगाव तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा.किशोर आप्पा पाटील मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर रिपाइं आठवले जळगांव जिल्हाअध्यक्ष आनंद जी. खरात यांच्या सह शिव व्याख्याते प्रदीप दादा देसले, रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ बागुल,शिक्षक सेना अध्यक्ष यशराज निकम, ईश्वर भाऊ बाविस्कर, संगीताताई साळुंखे, अनिल केदार,सुधाकरभाऊ पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भडगाव शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा निर्माण व्हावा म्हणून त्यांना संस्थेच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती भेट देण्यात आली.

लवकरच भडगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाईल असे आस्वासित केले असता उपस्थित सर्व समाज बांधवानी आमदार किशोर आप्पा पाटील यांचे अभिनंदन केल या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आप आपले मनोगत व्यक्त केले मेळाव्यास तालुक्यातील रिपाइंचे पदाधिकारी कार्यकर्ते, समाज बांधव व मित्र परिवार,महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचंड जनसमुदाय उपस्थित केल्या बद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी रिपाई आठवले पक्ष्याचे तालुका अध्यक्ष यांचे अभिनंदन करून भरभरून कौतुक केले. सुधाकर सोनवणे सर यांनी सूत्रसंचालन करून खेडकर आण्णा यांनी प्रास्तविक करून आभार मानले.

 

Comment As:

Comment (0)