No icon

Pune : Daksh Police Times

45 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या PMPML च्या इलेक्ट्रॉनिक बसला भीषण आग

पुणे-सोलापूर मार्गावर दुर्घटना

अग्निशमन दलाच्या नीलेश लोणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस इलेक्ट्रॉनिक असल्याने शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता असू शकते.
नेमके कारण स्पष्ट नाही.


घोरपडी : पुणे - सोलापूर रस्त्यावरील काळू बाई चौकाजवळ ९३ अव्हेन्यू मॉलसमोर आज सायंकाळी साडे सातच्या सुमारास पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रॉनिक
बसला आग (PMPML Electric Bus Fire) लागल्याची घटना घडली. 
सुदैवाने सर्व प्रवाशांना तातडीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणली. 
धायरीहून हडपसरला निघालेली बस क्रमांक १५ (एमएच १२ एसएफ ००२६) रेसकोर्स जवळ आल्यावर बसमधील प्रवाशांना काहीतरी जळल्याचा दुर्गंध येत 
असल्याचा बस वाहकांना कळवले. फातिमा नगरला बस पोहचल्यावर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी वाहन चालकाने बसमधून धूर येत असल्याचे सांगितले. 
चालकाने तातडीने बस रस्त्याच्या कडेला घेतली. जवळपास ४० ते ४५ प्रवाशांना खाली उतरवले. त्याच वेळी बसच्या मागच्या बाजूला थोडी आग लागली. 
बसमधील आग नियंत्रण यंत्र आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु यंत्र सुरू झाले नाही. अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांमधून आग नियंत्रण यंत्र 
घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने आणखी भडका घेतला आणि काही वेळात संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली. 

अग्निशामक दलाची कोंढवा, बीटी कवडे रास्ता आणि हडपसर केंद्राच्या अग्निशामक दलाच्या गाड्या आल्यामुळे त्यांनी आग आटोक्यात आणली. अग्निशमन 
दलाच्या नीलेश लोणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस इलेक्ट्रॉनिक असल्याने शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता असू शकते. नेमके कारण स्पष्ट 
नाही. परंतु, आगीचे वृत्त समजताच तातडीने आम्ही पोहचलो आणि आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा धोका टळला. 
वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे त्याठिकाणी तातडीने पोहचल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवले, त्यामुळे काही वेळात वाहतूक कोंडी 
कमी झाली. अग्निशामक दलाचे नीलेश लोणकर, दीपक कचरे, मोहन सणस, रवी बरटक्के, अनुराग पाटील, कुणाल खोडे, रामराज बागल व इतर कर्मचारी 
यांनी ही आग आटोक्यात आणली. 

 

Comment As:

Comment (0)