No icon

Pune : Daksh Police Times

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे.

-सतर्कतेचा इशारा-

पुणे शहराजवळील खडकवासला धरण ८०%, पानशेत ९४% आणि टेमघर ७८% एवढ्या क्षमतेने भरलेले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराशी सलग्न असलेले पवना धरण ८४% क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे.

दि. २८/०७/२०२४ च्या रात्री व दि. २९/०७/२०२४ च्या पहाटे अतिवृष्टीचा अंदाज दिल्यामुळे पुढील ४८ तासांत मुठा व पवना नदीपात्रात पर्जन्यमानानुसार व येव्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत खडकवासला व पवना धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू असुन पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल.

उपरोक्त विषयानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी मुठा नदीपात्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी पवना नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन एरिया) उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील

संबंधीत नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये.

खबरदारीची सुचना - माहे ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुठा व पवना नदीचे निषिद्ध क्षेत्र त्वरीत रिक्त करुन योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्यात यावी, ही विनंती.

Comment As:

Comment (0)