No icon

Pune : Daksh Police Times

वारजे माळवाडी येथे वाहत असलेल्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे परीसारत अत्यंत दुर्गंधी पसरली आहे

प्रभाग क्र ३२ वारजे माळवाडी मधील गणपती माथा ते वारजे माळवाडी चौक असणाऱ्या एनडीए मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यापासून ड्रेनेज लाईन तुडुंब भरून वाहत आहे. मुख्य  रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. अशात या वाहणाऱ्या ड्रेनेज मलनिस्सारन च्या पाण्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच या परिसरात प्रवास करणारे शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना या दुर्गंधी मधून प्रवास करावा लागत आहे. त्याचप्रमाणे या रस्त्यालगत अनेक दुकाने, छोटे मोठे हॉटेल, स्टॉल आहेत त्यांना देखील फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी झाल्यावर जे नागरिक पायी चालत प्रवास करत असतात त्यांना देखील या दुर्गंधी पाण्यातून चालत जावे लागते. तसेच गणपती माथा पासून पुढे अनेक गावे आहेत सदर गावांमध्ये जाण्यासाठी अनेक नागरिक या रस्त्यावरून प्रवास करत असतात त्यांना देखील या घाण पाण्यातून ये जा करावी लागत आहे. सध्या अर्धा रस्ता या दूषित पाण्याने व्यापलेला आहे त्यामुळे या रस्त्यावर व आजूबाजूच्या परीसारत अत्यंत दुर्गंधी पसरली आहे व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आहे. वारंवार तक्रार करूनही संबंधित अधिकारी या प्रकारामध्ये लक्ष देत नाहीयेत. पुणे मनपा वार्षिक २०२३-२४ अंदाजपत्रकामध्ये या गणपती माथा ते वारजे माळवाडी चौक मुख्य रस्त्यावरील संपूर्ण ड्रेनेज लाईन बदलणे या साठी निधीची तरतूद करण्यात आली होती परंतु प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्या दुर्लक्षतेमुळे सदर बजेट लॅप्स झाले. यामुळे सदर परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही मलनिस्सारन वाहिणी बदलणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्वीची ड्रेनेज लाईन ही २० ते २५ वर्षांपूर्वी तेव्हाच्या लोकसंख्येचा विचार करून महापालिकेने टाकलेली होती. परंतु सध्या लोकसंख्या झपाट्‌याने वाढत आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून मोठ्या व्यासाची मलनिस्सारन वाहिनी सदर मुख्य रस्त्यावर लवकरात लवकर बदलून देण्यात यावी. तसेच सध्याच्या वाहणाऱ्या या ड्रेनेज पाण्याचे त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा आम्हास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधीं व नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागेल. तरी आपणास विनंती की या कामासाठी निधी उपलब्ध आहे किंवा नाही आहे हे न बघता या कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन युद्ध पातळीवर त्वरित या मलनिस्सारन वाहिनीचे नव्याने बदलण्याच्या कामास सुरुवात करण्यात यावी व या प्रकरात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्या ही नम्र विनंती.

Comment As:

Comment (0)