No icon

Pune : Daksh Police Times

जुन्या मुंबई- पुणे हायवे वरील वाकडेवाडी व पाटील इस्टेटकडुन येणा-या सर्व प्रकारच्या गाड्यांना वाकडेवाडी अंडरपासमधुन येण्यास बंदी करण्यात येत आहे

शिवाजीनगर वाहतूक विभागांतर्गत दि.२५/०५/२०२४ रोजी पासुन मेट्रोचे गर्डर बसविण्याचे काम चालु असुन, त्याकरीता वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडीमार्गे सिमला ऑफीस चौक असे डायव्हर्शन करण्यात आलेले आहे. वाकडेवाडी व पाटील इस्टेटकडुन येणा-या चारचाकी व तीनचाकी गाड्या वाकडेवाडी (ग. दी. माडगुळकर अंडरपास) अंडरपास मधुन न. ता. वाडीकडे येतात. त्यामुळे जास्त प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. सदर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकरीता वाहतूकीत बदल करणे आवश्यक आहे. याकरीता महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र.एम.व्ही. ए.०१९६/८७१/ सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मी रोहिदास पवार, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक, पुणे शहर शिवाजीनगर, खडकी वाहतूक विभागातील वाहतूकीत दि.१०/०६/२०२४ रोजीपासून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात बदल करीत आहे.

* जुन्या मुंबई- पुणे हायवे वरील वाकडेवाडी व पाटील इस्टेटकडुन येणा-या सर्व प्रकारच्या तीनचाकी व चारचाकी गाड्यांना वाकडेवाडी (ग. दी. माडगुळकर अंडरपास) अंडरपासमधुन येण्यास बंदी करण्यात येत आहे. I पर्यायी मार्ग सदर वाहनांनी संचेती चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.

Comment As:

Comment (0)