No icon

Pune : Daksh Police Times

भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांना २१ हजार मतांची आघाडी

 पुण्यात काँग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयम अशी चौरंगी बघायला मिळाली होती. यापैकी पुण्यातील जनतेला कौल नेमका कुणाला असेल? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. 

पुण्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात काँग्रेसने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली होती. वंचित बहुजन आघाडीनेही माजी नगरसेवक वसंत मोरे आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने (एमआयएम) माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी दिल्याने पुण्यात पहिल्यांदाच पुणे महापालिकेतील चार माजी नगरसेवकांमध्ये चौरंगी लढत बघायला मिळाली. ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ किती मते घेणार, यावर मोहोळ यांचा भिस्त असून, धंगेकर यांनी ही मते मिळविल्यास मोहोळ यांचा मार्ग खडतर होईल. त्यामुळे धंगेकरांचा ‘कसबा पॅटर्न’ लोकसभेमध्ये चालणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे. दरम्यान, पुण्यात थोड्याच वेळात मतदामोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुण्यातील जनतेचा कौल नेमका कुणाला हे आज स्पष्ट होणार आहे. 

Comment As:

Comment (0)