No icon

Pune : Daksh Police Times

वारजे येथील विकसित होत असलेले संजीवन वन उ‌द्यान व टेकडीवर केलेले वृक्षारोपण

गेल्या 3 वर्षांपूर्वी वन विभाग व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील वन विभागाच्या किमान 35 एकर जागेमध्ये माझ्या प्रयत्नाततुन पुणे महानगरपालिकेकडून अडीच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून हे संजीवन वनउ‌द्यानाचे काम सुरु आहे. सध्या या संजीवन वनउ‌द्यान मध्ये नियोजित केलेल्या आराखड्‌या प्रमाणे काम सुरु असून तरी त्यात त्रुटी आहेत. या संदर्भात आम्ही आपणास वारंवार विनंती केली की या प्रकल्पाची आपण संयुक्तं पणे पाहणी करावी. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लागवड केलेल्या झाडांना पाण्याचा पुरवठा कमी होत आहे. कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच संजीवन उ‌द्यानाची हद्द सोडल्यानंतर उदाहरणार्थ उरीट नगर ते पश्चिम रंग या 24 मीटर डी पी रस्त्यालागत असलेल्या वन विभागाच्या जागेमध्ये अस्तित्वात असलेली अनावश्यक असलेली विषारी झाडे आपण वन विभागाच्या मार्फत काढून त्या ठिकाणी आपल्या विभागाच्या सहकार्याने व स्थानिक सोसायटी, शाळांचे वि‌द्यार्थी, बांधकाम व्यावसायिक व सामाजिक संस्था यांच्या मध्यमातून किमान 7000 वृक्षांची लागवड केलेली आहे. आता सध्या उन्हाळा सुरू असल्याने त्यांना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु अद्यापही सदर ठिकाणी लागवड केलेल्या वृक्षांना कोणत्याही प्रकारची पाणी देण्याची व्यवस्था केली गेलेली नाही. आपल्या विभागाला वारंवार तक्रार देऊन, पत्र व्यवहार करून तसेच समक्ष भेटून याबाबत महिती देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. या टेकडीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांची देखील या सर्व प्रकाराबाबत फार तक्रारी आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की, या टेकडीवर पूर्वी असलेली मोठी झाडे, वृक्ष तेच चांगले होते तेव्हा टेकडीवर चालायला गेलेल्या नागरिकांना झाडांची सावली मिळत होती, निसर्गरम्य वातावरण निर्माण होत होता अनेक पशू पक्षी यांना त्या झाडांचा आसरा मिळत होता परंतु आपल्या विभागामार्फत ती सर्व झाडे काढून टाकण्यात आली व सदर टेकडी ओसाड करण्यात आली तसेच नागरिकांच्या सहकार्याने नवीन रोपांची लागवड केली परंतु वनविभागा मार्फत त्या रोपांची देखील देखभाल व्यवस्थित रित्या घेण्यात येत नाहीये या रोपांना वेळेवर पाणी देण्यात येत नाही तसेच पाणी साठवण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. असेच राहिले तर ही नवीन रोपे देखील जळून जातील व सदर टेकडी संपूर्ण पणे ओसाड पडून जाईल. वन विभाग वन रक्षणासाठी आहे की वननाश करण्यासाठी आहे असा प्रश्न वन विभागाच्या या ठिकाणी सुरु असलेल्या कारभारावरून उपस्थित होऊ तागला आहे. नागरिक बनरक्षणासाठी, वृक्षारोपणासाठी पुढे येत असताना वन विभागाची उदासीनता संताप निर्माण करणारी आहे संजीवन उद्‌द्यानाच्या विकासाबाबत वन विभागाचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे पर्यावरण प्रेमी नागरिक आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. या जन आंदोलनास सर्वस्वी वन विभाग जबाबदार राहील. दिवसेंदिवस उष्णतेची लाट वाढत असताना वृक्ष संवर्धनासाठी वन विभाग सतर्क होणार आहे की नाही हा जनसामान्यांच्या मनात प्रश्न आहे. तरी आपणास विनंती की पाऊसाळा सुरु होण्यापूर्वी या टेकडीची पाहणी करून या सर्व गोष्टींवर योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा परिसरातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन आम्हाला या बाबत टोकाची भूमिका घ्यावी लागेल.

सौ. दिपाली प्रदिप धुमाळ

विरोधी पक्षनेत्या, पुणे महानगरपालिका

नगरसेविका, पुणे महानगरपालिका

सदस्या, वृक्ष प्राधिकरण समिती पुणे महानगरपालिका

Comment As:

Comment (0)