No icon

Pune : Daksh Police Times

गुड न्यूज, मान्सून केरळात दाखल, महाराष्ट्र १० जूनला सुखावणार

मुंबई:  देशातील तापमानात कमालीची वाढ झालेली आहे. काल दिल्लीत तापमानाने रेकॉर्ड केले. दरम्यान राज्यात मान्सून कधी दाखल होणार याबाबत सर्व वाट पाहात आहेत. याबाबत आता हवामान विभागाकडून India Meteorological Department (IMD) मोठी अपडेट देण्यात आली आहे.

आज मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सून उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच आज कोकणात हलक्या सरी कोसळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रत्येकवर्षी मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होत असतो. यावेळी मान्सून एक दिवस आधी म्हणजे ३१ मे रोजी केरळात
येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता मात्र एक दिवस आधीच ३० मे लाच मान्सून केरळात दाखल झाला आहे.

तर पुढील १० दिवसात म्हणजे १० जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

Comment As:

Comment (0)