No icon

Pune : Daksh Police Times

दहावीच्या परीक्षेचा उद्या निकाल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थी दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाइन निकाल पाहू शकतात.

●mahresult.nic.in

●sscresult.mkcl.org

●sscresult.mahahsscboard.in

●results.digilocker.gov.in

●results.targetpublications.org

या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यास गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून

( http://verification.mh-sscac.in)

स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी २८ मे ते ११ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून शुल्क भरता येणार आहे.

Comment As:

Comment (0)