No icon

Daksh Police Times

समर्थ विद्यामंदिर चाफळ जिल्हा सातारा येथील शाळेतील शिक्षक कुंभार सर आणि गायकवाड मॅडम यांच्या निरोपसमारंभात आजी- माजी विद्यार्थ्यां चे डोळे पाण्याने भरून आले .

समर्थ विद्यामंदिर चाफळ तालुका पाटण जिल्हा सातारा येथील शाळेतील माननीय शिक्षक कुंभार सर आणि गायकवाड मॅडम यांचा निरोप समारंभ घेण्यात आला माननीय कुंभार सर हे गेले 30 वर्षापासून समर्थ विद्यामंदिर चाफळ येथे शिक्षक म्हणून कामाला लागले आज त्यांची दिनांक 16 4 2024 रोजी सेवानिवृत्तीची वेळ आली यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते पंचक्रोशीतील नामांकित पुढारी यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर लाभला गेल्याआजी विद्यार्थी माजी विद्यार्थी त्यांचे डोळे पाण्याने भरून आले 30 वर्षापासून ते शाळेत आपली सेवा योग्य पद्धतीने आणि प्रामाणिकपणे देत होते त्यांच्या हातून विविध क्षेत्रात सामाजिक किंवा गव्हर्मेंट चांगल्या चांगल्या पदावर विद्यार्थी त्यांच्या हातून योग्य प्रकारे आणि चांगल्या प्रकारे जॉब वरती कामाला आहेत आज त्यांचे शाळेतील योगदान हे रिटायरमुळे थांबण्यात आले याची मोठी शोकांतिका विद्यार्थ्यांना आहे आज त्यांना निरोप देताना त्यांच्या हातून शाळेसाठी खूप मोठे योगदान लाभले असे शिक्षक सदैव आपल्या शाळेला मिळावेत अशी भावना जन्मतात आपणास पहावयास मिळाली यामध्ये शाळेचे प्राचार्य शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले.

माजी विद्यार्थ्यांनी यामध्ये मनोगत व्यक्त केले प्राचार्य सरांनी त्यांचे लाभलेले योगदान एक शब्दात मांडता येणार नाही अशा प्रकारे व्यक्त केले त्यांच्या  पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाचे सांगता समारंभ करण्यात आला सदैव असे शिक्षक आपल्याला लाभावेत हीच विद्यार्थ्यांची प्रामाणिकपणे मागणी होती आज कुंभार सर आणि गायकवाड मॅडम यांना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले.

Comment As:

Comment (0)