No icon

जळगाव : दक्ष पोलिस टाइम्स

जळगांवकरांच्या "तरतरीत"पणा ला चालना देणार पाटील अमृततुल्य चहा

"चहा म्हणजे अमृत" हे आपल्या भारतीय लोकांचे गणित झालंय, मग तुम्ही काश्मीर ते कन्याकुमारी, कुठलेही असा.. पण दिवसातून कमीत कमी 2 वेळा चहा हा लागतोच. आता चहा पण चवदार, दमदार, मसालेदार भेटलं तर मग चहा घ्यायची मजा काही औरच... ही मजा सध्या जळगांव शहरातील पिंप्राळा गावातील बऱ्याच लोकांना अनुभवता येत आहे,  ती म्हणजे गुजराल पेट्रोल पंप समोरील बाजार रस्त्या ला लागून असलेल्या " पाटील अमृततुल्य" येथे.  विकास गोल्ड चे घट्ट दूध, प्रमाणित मसाले, उच्च प्रतीची चहा पावडर,  सल्फर मुक्त साखर आणि सोबतीला पाटील दादा च्य्या हातची चव हे जुळवून आणलेलं गणित म्हणजे खरंच "अमृत-तुल्य" अश्या चहाच रहस्य. 
           "ना पुण्याचा ना मुंबई चा, चहा आपल्या खान्देश चा" हे वाक्य मनाशी धरून , कोणाचीही फ्रांचाईसी न घेता स्वतःचा व्यवसाय विकसित करावा हे  स्मरणात धरून आपल्या खान्देश मधील  गणेश पाटील आणि त्यांचे बंधू यांनी मिळून पाटील अमृततुल्य ची सुरुवात जानेवारी २०२०  ला गुजराल पेट्रोल पंप समोर , बाजार रस्त्या ला केली आणि ह्यात त्यांना हातभार लावला त्यांच्या घरच्या लोकांनी. आजच्या स्पर्धेच्या युगात किंवा कुणाची नक्कल करण्याच्या जगात, पाटील ह्यांनी स्वतः चा चहा बनविण्याची पद्धत विकसित केली . मसाल्यांचा अति वापर टाळून योग्य प्रमाणात चहा चा मसाला घरच्या घरी तयार करून दुकानात आणला जातो. हा मसाला बनवायला त्यांच्या पत्नी आणि वहिनीची त्यांना मदत होते. नंतर चव द्यायचं काम हे त्यांच्या बंधू चे. 
            स्वच्छता आणि चव ह्या दोन गोष्टी ना डोळ्या समोर ठेवून पाटील अमृततुल्य हे पिंप्राळा वासियांच्या मन पसंती ला पात्र झाले आहे. चहा चे शौकीन, शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर्स, व्यावसायिक, तरुण वर्ग, ज्येष्ठ वर्ग , अगदी वेठ बिगरीच्या कामगरापासून तर उच्च-भृ पर्यंत, सर्वांच्या चवीला आणि पसंतीला पाटील अमृततुल्य प्राधान्य देऊन सर्वांना रोजच्या दैनंदिन आयुष्यात "तरतरी"देण्याचं काम अगदी चोख पद्धतीने करत आहे. लवकरात लवकर त्यांच्या चहा ची चव ही जळगांव च्या प्रत्येक भागात पोहविण्यासाठी प्रयत्न ते करणार आहे, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Comment As:

Comment (0)