No icon

पिंपरी : दक्ष पोलिस टाइम्स

कांदा निर्यातबंदीच्या धोरणाविरोधात चांदवड येथे प्रहारचे अनोखे आंदोलन

प्रहार जनशक्तीतर्फे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदी विरोधात शेतकऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत केंद्र सरकारने लागू केलेली कांदा निर्यातबंदी तत्काळ हटवावी, कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून द्यावे, मगच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यात यावे असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी दिला. (

चांदवड येथे कांदा निर्यातबंदी विरोधात ‘प्रहार’तर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून कांदा निर्यातबंदी विरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

टाळ, मृदंग, भजन गात शासकीय विश्रामगृह येथून ही अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरकारने निर्यात बंदी करून कांदा उत्पादकांवर अन्याय केला असून निर्यातबंदी उठवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने त्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे.

चांगल्या भावात कांदा विक्री होत असताना एका रात्रीत केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांचा फटका बसला असून हा तोटा सरकारने त्वरित भरून द्यावा व कांदा निर्यातबंदी उठवावी, कांदा निर्यातबंदी हटवून निर्यातबंदी मुळे शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान भरून द्यावे, बॅंकाची व फायनान्स ची कर्जवसुली त्वरित थांबवावी, पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी, या प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार जे.एस.केदारे यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, रेवन गांगुर्डे, चेतन गांगुर्डे, गोरख पारधी, भरत शेंडे, सतीष काळे, दीपक जाधव, सुकदेव गांगुर्डे, समाधान आहेर, विजय वाघ, सुभाष गोजरे, रामदास पवार, अनिल पवार, विजय निमसे, गोरख ढगे, अनिल जाधव, संदीप जाधव, लहानू रौंदळ, सचिन जाधव, सुयोग जाधव, सुनील आहेर, दत्तात्रेय आहेर, आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Comment As:

Comment (0)