No icon

Daksh Police Times

30 लाखांची खंडणी मागणाऱ्या बापू नायर टोळीतीलसराईत गुन्हेगारवर गुन्हे शाखेच्या पथक दोनने केली कारवाई.

पुणे : व्यवसायात खुप आर्थिक फायदा झाला आहे या कारणावरुन तसेच भविष्यात व्यवसायात कोणताही अडथळा न करण्यासाठी व्यावसायिकाकडून 10 लाख रुपये खंडणी घेतली . त्यानंतर पुन्हा जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देऊन 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या बापू नायर टोळीतील (Bapu Nair Gang) सराईत गुन्हेगार व त्यांच्या साथीदारांवर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक (Anti Extortion Cell Pune) दोनने कारवाई केली आहे. हा प्रकार जुलै 2021 ते 16 मे 2024 या कालावधीत वरखडे नगर, कात्रज (Varkhade Nagar Katraj) येथे घडला आहे.(Pune Crime News)

तबरेज मेहबुब सुतार Tabrez Mehboob Sutar (रा. कात्रज), अविनाश नामदेव मोरे (रा. सहकारनगर, पुणे), सागर किसन धुमाळ Sagar Kisan Dhumal (रा. अपर डेपो, पुणे), कुमार उर्फ पप्पु सायकर (रा. सासवड, पुणे) यांच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) आयपीसी 386, 387, 504, 506(2), 507, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कात्रज येथील 34 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे इलेक्ट्रीक व्यवसायिक असून त्यांचा प्लॉट खरेदी-विक्रीचा देखील व्यवसाय आहे.
फिर्यादी यांना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तबरेज सुतार हा बेकायदेशीर पैशाच्या मागणीसाठी धमकावत असल्याची तक्रार खंडणी विरोधी पथकाला प्राप्त झाल होती.
त्यानुसार तपास केला असता तबरेज खान याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी
मागितल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन अविनाश मोरे व सागर धुमाळ यांना ताब्यात घेतले असून ते
सध्या पोलीस कस्टडी मध्ये आहेत. तर तबरेज सुतार हा बापु नायर टोळीतील सक्रीय सदस्य असून तो मार्च 2023 पासून
जेलमध्ये आहे. तबरेज याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न असे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Pune Crime Branch)

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, पवन भोसले, चेतन शिरोळकर, अमोल राऊत, प्रशांत शिंदे यांच्या पथकाने केली.

Comment As:

Comment (0)