No icon

Daksh Police Times

पुणे शहरात वाहन चोरी करणाऱ्या  गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या

पुणे :  पुणे शहरात वाहन चोरी करणाऱ्या  गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीकडून पाच दुचाकी जप्त करुन पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई राजेवाडी झोपडपट्टीच्या पाठीमागील सार्वजनिक शौचालयासमोर करण्यात आली. ललीत सुनिल भोई-परदेशी (वय-29 रा. विश्वनाथ अपार्टमेंट, पर्वती गांव, पुणे) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याने तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्या दरम्यान पोलीस अंमलदार इम्रन शेख व शरद घोरपडे यांना माहिती मिळाली की, राजेवाडी झोपडपट्टीच्या मागील सार्वजनिक शौचालयाजवळ एक जण दुचाकीसह संशयित रित्या थांबला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला.


पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील मोटार सायकल (एमएच 12 एन क्यु 6583) जप्त केली. आरोपीकडे सखोल तपास केला असता त्याच्याकडून आणखी चार दुचाकी जप्त करुन विश्रामबाग, सहकारनगर, दत्तवाडी/पर्वती आणि वाशिम जिल्ह्यातील मनोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेले दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल्ल,
सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील,
पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने,
पोलीस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, सहायक पोलीस फौजदार संतोष पगार, पोलीस अंमलदार रोहीदास वाघेरे,इम्रान शेख, शिवा कांबळे, औचरे, रहीम शेख, कल्याण बोराडे, शरद घोरपडे, अविनाश दरवडे यांच्या पथकाने केली.
 

Comment As:

Comment (0)