No icon

पुणे: दक्ष पोलिस टाइम्स

पुणे विद्यापीठातील ललित केंद्रांमध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University - SPPU) ललित केंद्रामध्ये (Lalit Kala Kendra) मोठा गोंधळ झाला. तसेच ललित कला केंद्रात तोडफोड करण्यात आली. या प्रकरणाची माहिती वरिष्ठांना देण्यास उशिर केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील (Chaturshringi Police Station) पोलीस उपनिरीक्षकाला तडकाफडकी निलंबित (Pune Police PSI Suspended) करण्यात आले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर त्याठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त न लावल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सचिन शंकर गाडेकर (PSI Sachin Shankar Gadekar) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. निलंबनाचे आदेश पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले आहे. नव्यानेचे पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेल्या अमितेश कुमार यांनी पहिल्याच दिवशी माध्यमांशी बोलताना, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगितले होते. यानंतर पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात झालेला गोंधळ आणि त्यानंतर झालेल्या तोडफोडीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र या ठिकाणी सचिन गाडेकर यांची बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली होती. यावेळी गाडेकर यांनी योग्य ती काळजी न घेतल्याने तसेच त्या ठिकाणी शीघ्रकृती दलाला वेळेत बोलवले नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये नाटकाचा प्रयोग झाला आणि त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी गोंधळ घालत हे नाटक बंद करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास या कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्रात घुसत घोषणाबाजी करत त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व गोष्टींची तोडफोड केली तसेच खिडक्यांच्या काचा फोडून शाई फेक करण्यात आली होती.

Comment As:

Comment (0)