No icon

चांदवड : दक्ष पोलिस टाइम्स

चांदवड महाराष्ट्र मध्ये प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू व सुगंधी सुपारी ची आयशर ट्रक

चांदवड पेट्रोल पंप चौफुली येथे गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहिती महाराष्ट्र मध्ये प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू व सुगंधी सुपारी ची आयशर ट्रक मधून मालेगाव च्या बाजूने नाशिककडे वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चांदवड चे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व त्यांचे पथक पोलीस हवालदार विजय जाधव, पंकज देवकाते, दिनेश सूळ, चंद्रकांत पवार, विक्रम  बसते, यांनी चांदवड पेट्रोल पंप चौफुली येथे आयशर क्रमांक mp-13 -gv-8677 हा अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा चे बॉक्स मिळून आले. सर्व मालाचे मोजदान केले असता आठ लाख रुपये किमतीचा ट्रक व 18 लाख 19 हजार दोनशे रुपयांचा गुटखा असा एकूण 26 लाख 19 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी आयशर ट्रक ड्रायव्हर अजीम बहिद शेख राहणार बाराखड तालुका सिओनी मालवा जिल्हा होशंगाबाद, इंदोर याला अटक करण्यात आली असून पुढील तपास एपीआय आर के जाधव हे करीत आहे

Comment As:

Comment (0)