No icon

Pune : Daksh Police Times

पीएमपी बसमध्ये महिलांचे दागिने चोरणारे टोळी जेरबंद ! फरासखाना पोलिसांनी आणले 4 गुन्हे उघडकीस, 7 लाख 34 हजारांचा माल जप्त

पीएमपी बसमध्ये तसेच गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणार्‍या टोळीला फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police) अटक केली आहे. विकी कृष्णा माने (वय १९), राज कृष्णा माने (वय २३), कृष्णा रमेश माने (वय ४४, तिघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) सुधीर नागनाथ जाधव (वय ४६, रा. शास्त्रीनगर, मुंढवा) आणि संतोष शरण्णाप्पा जाधव (वय ४०, रा. मांजरी बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पीएमपी बसमध्ये तसेच गणेशोत्सवात अनेक नागरिकांच्या सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. त्यांचा तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. पोलीस अंमलदार गजानन सोनुने व प्रविण पासलकर यांना ८ ऑक्टोंबर रोजी बातमी मिळाली की, सूर्या हॉस्पिटलसमोरील पीएमपी बसस्थानकावर काही चोरटे थांबले आहे. या बातमीवरुन पोलिसांनी पाच जणांना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत फरासखाना पोलीस ठाण्यातील तीन आणि येरवडा पोलीस ठाण्यातील एक असे ४ गुन्हे उघडकीस आले.

त्यामधील १०२.६२० ग्रॅम सोन्याचे दागिने, सोन्याचे दागिने कटींग करण्यासाठी वापरलेले लोखंडी कटर असा सर्व मिळून ७ लाख ३४ हजार ६४ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे निरीक्षक अजित जाधव, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, सहायक फौजदार मेहबुब मोकाशी, पोलीस अंमलदार गजानन सोनुने, नितीन तेलंगे, महेश राठोड, संदिप कांबळे, प्रविण पासलकर, नितीन जाधव, तानाजी नागंरे, वैभव स्वामी, विशाल शिंदे, अर्जुन कुडाळकर, समीर माळवदकर, वसिम शेख, सुमित खुट्टे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर यांनी केली आहे.

 

Comment As:

Comment (0)