No icon

Pune : Daksh Police Times

चैनीसाठी दुचाकीची चोरी करणारे दोन अटटल चोरांकडुन चोरीच्या ०५ दुचाकी व १ रिक्षा जप्त : हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाची कामगिरी

फिर्यादी भारत सोपान जाधव क्य. ५३ वर्षे धंदा. ड्रायव्हर रा. आण्णाभाऊ साठेनगर वाकड पुणे मुळगाव- मडारवाडी ता.धाराशिव जि. धाराशिव यांनी दिनांक २१/०८/२०२४ रोजी तक्रार दिली की, दि.१९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८/०० वाजता ते दुपारी ०१/०० वा दरम्यान महेश बांदल याचे फार्म समोरील रस्त्याचे कडेला जांबे ता. मुळशी जि. पुणे येथुन त्याची हिरो कंपनीची स्लेंडर प्लस गाडी क्रमांक एम एच १४ एच एफ ५९०९ ही चोरीस गेली आहे त्यावरुन हिंजवडी पोलीस ठाणेत गु.र.नं. ९६०/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचा मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कन्हैया थोरात यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गोमारे, पोहवा ८३३ शिंदे, पोहवा १५७६ नरळे, पोशि २४०० शिंदे, पो.शि. २२८४ पालवे असे तपास करीत असताना, पोशि २२८४ पालवे यांना विश्वासु बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम हा चोरीची मोटार सायकल घेऊन लक्ष्मी चौक, मारूंजी रोड, पुणे येथे येणार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सपोनि गोमारे, पोहवा ८३३ शिंदे, पोहवा १५७६ नरळे, पोशि २४०० शिंदे, पो.शि. २२८४ पालवे यांनी दि. २१/०८/२०२७ रोजी लक्ष्मी चौक, मारूंजी रोड, पुणे येथे सापळा लावुन इसम नामे १) अक्षय बाबुलाल राकावत, वय २८, रा. आप्पा बांदल यांची खोली, कोलतेपाटीलच्या मागे, गायकवाड नगर, जांबे, ता. मुळशी, जि. पुणे मुळ रा. मु पो बरवा, ता. बिल्हाड, जि. जोधपुर, राजस्थान २) मदनलाल छोटुराम देवासी, वय २५, रा. आप्पा बादल यांची खोली, कोलतेपाटीलच्या मागे, गायकवाड नगर, जाबे, ता. मुळशी, जि. पुणे मुळ गाव रा. रेपडावास, तहसील सौजत, पाली, राजस्थान यांना स्प्लेंडर प्लस गाडी क्रमांक एम एच १४ एच एफ ५९०९ सह ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्हयात दिनाक २१/०८/२०२४ रोजी २१/३० वा. अटक केली. त्यानंतर आरोपींना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या आणखी ४ दुचाकी व १ ऑटो रिक्षा चोरी केल्याचे सांगितले त्याप्रमाणे त्या दुचाकी व रिक्षा जप्त करून करून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

१. हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ९६०/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२)

२. हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ७४८/२०२४ भा.द.वि. कलम ३७९

३. वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ८४७/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ ४. वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ८९३/२०२४ भा. न्या. संहीता कलम ३०३ (२)

५. हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं. ११०९/२०२४ भा. न्या. संहीता कलम ३०३ (२) ६. पौड पोलीस ठाणे पुणे ग्रामीण गु.र.नं. ३२१/२०२४ भा. न्या. संहीता कलम ३०३ (२)

सदरची कारवाई मा. श्री. विनय कुमार चौबे साो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. शशीकांत महावरकर सोो. सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी सो. अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड, मा. श्री. सुनिल कुऱ्हाडे सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, श्रेणी पोलीस उप निरीक्षक बंडू मारणे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, ओमप्रकाश कांबळे, मंगेश लोखंडे यांनी केली आहे.

Comment As:

Comment (0)